मगोच्या कार्यालयात यावं, मदत केली जाईल

मगोप नेते सुदिन ढवळीकरांचा गोंयकारांना मदतीचा हात; लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी त्रास होत असल्यास मदत करण्याचं आश्वासन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः देशातील कोरोनाचा वाढता उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण मोहिम जोरदार सुरू आहे. राज्यातही लसीकरण मोहिम हळुहळू का होईना, पण पुढे चाललीये. लवकरात लवकर प्रत्येक गोंयकाराला कोरोनाविरुद्धची लस मिळावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. अशाच परिस्थितीत मगोपच्या सुदिन ढवळीकरांनी गोंयकारांना मदत करण्यासाठी आपली दारं खुली केली आहेत.

हेही वाचाः गोवा कोविडबाधितांमध्ये पुढे, तर लसीकरण मोहिमेत मागे

मगोच्या कार्यालयात यावं, त्यांना मदत केली जाईल

लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर नावाची नोंद करावी लागते. पण बऱ्याचदा यात अडथळे येताना दिसतायत. पोर्टल स्लो असल्यामुळे अनेकजणांना त्यांचं नाव नोंदविण्यात अडचणींचा सामना करावा लागतोय. मगोपचे नेते सुदिन ढवळीकरांनी गोंयकारांना मदतीचा हात देऊ केलाय. ज्यांना लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी त्रास होतो आहे, त्यांनी मगोच्या कार्यालयात यावं, त्यांना मदत केली जाईल, असं सुदिन ढवळीकर म्हणालेत.

सरकारवर निसर्गही रुसलाय

तौक्ते चक्रीवादळाच्या रुपाने गोंयकारांनी नुकताच निसर्गाचा रूद्रावतार अनुभवला. निसर्गाने रूद्रावतार धारण केला की किती आणि काय प्रकारचं नुकसान होऊ शकतं हे काही तासांच निसर्गाने दाखवून दिलं. तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पडझड झालीये. कोट्यवधी रूपयांचं नुकसान झालंय. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांना या चक्रीवादळाने दणका दिल्यामुळे प्रचंड प्रमाणात लोकांचं नुकसान झालंय. या वादळाने दोन बळी घेतले. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ढवळीकरांनी सरकारवर निसर्गही रुसलाय, असं म्हणत अप्रत्यक्ष टीका केलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!