मगोप नेते डॉ. केतन भाटिकरांवर हल्ला

अज्ञात व्यक्तीकडून हल्ला; डॉ. भाटिकर सुखरूप; हल्ल्याचं कारण गुलदस्त्यात

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडाः राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचं पुन्हा पुन्हा उदाहरणांसहित समोर येत आहेत. रोज गुन्हेगारीचं नवनवीन प्रकरणे समोर येत असून पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहात आहे. फोंडा तालुक्यात सोमवारी सकाळी असाच एक प्रकार घडलाय. फिजिओेथेरपीस्ट तसंच मगोप नेते डॉ. केतन भाटिकर यांच्यावर एका अज्ञाताने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या भयंकर प्रकारानंतर सध्या फोंड्यात याच विषयाची चर्चा रंगली आहे.

हेही वाचाः पंतप्रधान मोदींनी लाँच केले e-RUPI

नक्की काय झालं?

सोमवारी सकाळी 11.30 वा. डॉ. केतन भाटिकर यांच्यावर कुणीतरी अज्ञाताने हल्ला केल्याचं समजतंय. डॉ. भाटिकरांच्या तिस्क- फोंडा येथील क्लिनिकमध्ये अज्ञात व्यक्ती शिरली आणि तिने त्यांच्यावर हल्ला केलाय. हल्ल्यामागचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मात्र प्रसंगावधान राखत डॉ. भाटिकरांनी स्वतःची या अज्ञातापासून सुटका करून घेतलीये.

हेही वाचाः बांद्यात होऊ शकतं, मग दोडामार्गात का नाही ?

डॉ. भाटिकरांच्या गळ्याला पकडलं

डॉ. भाटिकरांवर हल्ला करणारी व्यक्ती त्यांच्या क्लिनिकमध्ये शिरली आणि तिने त्यांच्या गळ्याला पकडलं. काही मिनिटं काय चाललंय ते डॉ. भाटिकरांच्या लक्षात येईना. मात्र त्यांनी कसं तरी करून स्वतःची त्या व्यक्तीपासून सुटका केली. डॉ. भाटिकरांवर हल्ला करणारी अज्ञात व्यक्ती स्वतःची ओळख सांगत नसून ती वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नावं सांगत असल्याची माहिती मिळतेय.

हेही वाचाः मोठी बातमी! यापुढे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण होणार नाही

लोकांनी दिला चोप

डॉ. भाटिकरांवर हल्ला करून ही अज्ञात व्यक्ती पळ काढण्याच्या तयारी होती. मात्र तेथील उपस्थितांनी त्या व्यक्तीचा पाठलाग करून तिला पकडलं आणि चांगलाच चोप दिला. डॉ. भाटिकरांनी अज्ञात व्यक्तीसह पोलिस स्टेशन गाठलं. तसंच झाल्या प्रकाराची पोलिसांना माहिती देत तक्रार नोंदवली आहे. सध्या ती अज्ञात व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात असून पुढील चौकशी सुरू असल्याचं समजतंय.

हा व्हिडिओ पहाः Video | Curfew Extenstion | रुग्णवाढ नियंत्रणात, मात्र कर्फ्यूवाढ सुरु

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!