मंत्री मॉविन गुदिन्होंना जीएसटी काऊन्सिलवरून हटवा

मगोप आमदार सुदिन ढवळीकरांची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः तामिळनाडूच्या अर्थमंत्र्यांशी झालेल्या वादानंतर राज्य सरकारने परिवहन मंत्री मॉविन गुदिन्हो यांना जीएसटी काऊन्सिलवरून हटवा, अशी मागणी गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि मगोप आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि तामिळनाडूचे अर्थमंत्री पलानीवेल थियागाराजन हे 28 मे रोजी झालेल्या 43 व्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत राज्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मुद्द्यावर भिडले होते.

हेही वाचाः CORONA | अहमदनगरमध्ये कोरोनाची तिसरी लाट?

तर मुख्यमंत्र्यांनी जीएसटी परिषदेवर राज्याचं प्रतिनिधित्व करावं

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असताना गुदिन्हो यांची जीएसटी काऊन्सिलवर नियुक्ती करण्यात आली होती. ते अजूनही परिषदेवर गोव्याचं प्रतिनिधित्व करत आहेत. जेव्हा राज्य वित्त खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जीएसटी काऊन्सिलवर राज्याचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे, असं ढवळीकर म्हणाले.

हेही वाचाः चीनमध्ये एका व्यक्तीला बर्ड फ्लूच्या स्ट्रेनची बाधा

गोव्यासाठी अस्ताव्यस्त परिस्थिती

उच्च शिक्षित व्यक्ती असलेले राजन यांच्याशी शाब्दिक वाद घालून गुदिन्हो यांनी गोव्यासाठी अस्ताव्यस्त परिस्थिती निर्माण केली असल्याचं ढवळीकर म्हणाले. तसंच राज्य सरकारच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीवर पांघरूण घालण्यात आलेल्या प्रयत्नांबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला.

हेही वाचाः कोरोनानंतर आता ‘म्यूकरमायकोसिस’चा वाढता कहर

आर्थिक परिस्थिती सुधारतेय की ढासळतेय?

राज्य सरकारच्या बाजूने 30 मे रोजी गोवा घटक राज्य दिनाच्या दिवशी लेख प्रसिद्ध करून राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचा दावा करण्यात आला, तर त्याअगोदर दोन दिवस आधी गुदिन्हो यांनी जीएसटी काऊन्सिलमध्ये राज्य आर्थिक संकटातून जात असल्याचं सांगितलं. त्यांनी जीएसटी काऊन्सिलला नुकसान भरपाई आधीच जाहीर करण्याचं आवाहन केलं होतं, ज्यामुळे राज्याला आर्थिक संकटावर मात करावी लागेल.

हेही वाचाः पत्रकारितेचं विद्यापीठ हरपलं ; ज्येष्ठ संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांचं निधन

ढवळीकरांचा सवाल

परिषदेवर गोव्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्र्यांनी पैसे लवकर जाहीर करण्याची मागणी करून हताशपणा दाखवला असल्याची टीका ढवळीकरांनी केलीये. जर राज्याची आर्थिक स्थिती सुधारत असेल तर आपल्याला पैसे लवकर लवकर द्यावेत अशी मागणी का करावी लागतेय? असा सवाल ढवळीकरांनी उपस्थित केलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!