मेळावलीतील लोकांना साडेपाचशे पोलिस येऊन अटक करणार?

मेळावलीतील ग्रामस्थांची मदतीसाठी आर्त हाक

Goan Varta Live | प्रतिनिधी

सत्तरी : एक धक्कादायक बातमी हाती येते आहे. सत्तरीतील मेळावलीवासीयांनी एक व्हिडीओ जारी केलाय. या व्हिडीओतून मेळावलीतील ग्रामस्थांनी राज्यातील समस्त जनतेला मदतीची याचना केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साडेपाचशे पोलिस मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थिती मेळावलीतील ग्रामस्थांना अटक करण्यात येणार असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. इतकंच नाही तर त्यासाठी साडेपाचशे पोलिसही अटकेची कारवाई करण्यासाठी येणार असल्याचं जारी करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलंय.

गोव्यातील भाऊबहिणींना साद

गोव्यातील भाऊ बहिणींनी आमची मदत करावी, आणि आमच्या सोबत राहून आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी आर्त साद मेळावलीतील ग्रामस्थांनी घातली आहे. मेळावलीतील काही तरुण आणि ग्रामस्थ या व्हिडीओमध्ये दिसून येत आहेत. गावातील देवतेला नमस्कार करुन त्यांनी आपला संदेश व्हिडीओच्या स्वरुपात जारी केलाय.

कशासाठी अटक?

१ मिनिट २३ सेकंदांचा व्हिडीओ या ग्रामस्थांकडून जारी करण्यात आला आहे. यामध्ये गोवा सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. गोवा सरकारनं आमच्यावर संकट आणलं असून आम्हाला अटक करण्याचं फर्मान काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गोमंतकीयांना या गावातील लोकांनी मदतीचं आवाहन केलंय.

हेही वाचा – बापरे! 12 वर्षीय मुलगी खेळता खेळता गटारात पडली आणि जागीच गेली

पंचनामा – आयआयटीला होणाऱ्याच नेमक्या विरोधाचं कारण आहे हे – Video

दरम्यान, मंगळवारी नेमकं काय घडतं, हे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून सध्या मेळावली वासियांनी दिलेला संदेश राज्यातील प्रत्येक नागरीकापर्यंत पोहोचवला जातोय.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – धक्कादायक! मंगळुरूहून गोव्यात परतत होते, पण वाटेतच मृत्यूनं गाठलं

हेही वाचा – अबब! हे काय गोवा अद्याप महाराष्ट्राचा जिल्हा ?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!