कोकण रेल्वे मार्गावर 21 ते 30 ऑगस्टपर्यंत मेगाब्लॉक

रोहा ते वीर दुपदरीकरण अंतिम टप्प्यात

रुपेश पाटील | प्रतिनिधी

सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावर २१ ते ३० ऑगस्टपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांना त्या-त्या स्थानकांवर विशिष्ट कालावधीसाठी थांबा देण्यात येणार आहे. रोहा ते वीर येथील दुपदरीकरण अंतिम टप्प्यात आले असून काही स्थानकांवरील रुळ जोडण्यांच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. २१ ऑगस्टला धावणारी तिरुवअनंतपूरम – लोकमान्य टिळक स्पेशल गाडी रत्नागिरी, चिपळूण व खेड या स्थानकांवर थांबवण्यात येणार आहे.

जामनगर-तिरुनेलवल्ली कोलाड किंवा माणगाव स्थानकावर २.२० तास, २२ ऑगस्टला एलटीटी-थिरुतअनंतपुरम कोलाडला एक तास थांबेल. हापा मडगाव २५ ऑगस्टला पश्‍चिम रेल्वे मार्गावर तर थिरुतअनंतपुरम-एलटीटी रत्नागिरी किंवा चिपळूणात एक तास थांबेल. तिरुनवेल्ली-दादर वीर स्थानकात तीस मिनिटे थांबेल.

जामनगर-तिरुनवेल्ली २७ ऑगस्टला पश्‍चिम रेल्वे मार्गावरील कामासाठी अडीच तास उशिराने धावणार आहे. २९ ऑगस्टला करंजाडी येथे एर्नाकुलम-अजमेर गाडी अर्धा तास थांबवण्यात येणर आहे. मडगाव-मुंबई विशेष गाडी ३० ऑगस्टला चिपळूण, खेड येथे थांबणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!