११ ते १४ एप्रिल राज्यात मेगा लसीकरण

मंत्री विश्वजीत राणेंनी जाहीर केला कार्यक्रम

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजीः ११ ते १४ एप्रिल असे ४ दिवस देशभर चालणाऱ्या लसीकरण मोहिमेंतर्गत गोव्यात होणाऱ्या लसीकरण कार्यक्रमाची घोषणा आरोग्य मंत्री विश्वजीत राणेंनी केलीय. या काळात जास्तीत जास्त लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करणार असल्याचं मंत्री राणे म्हणालेत. पहिल्या टप्प्यात गोव्यातील २० पंचायतींमध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं राणेंनी सांगितलंय.

अशी चालणार लसीकरण मोहीम

 • ११ ते १४ एप्रिल राज्यात २० पंचायतींमध्ये होणार लसीकरण कॅम्प
 • याकाळात जास्तीस जास्त लोकांना लस देण्यासाठी प्रयत्न करणार
 • सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालणार कॅम्प
 • फक्त ४५ वर्षांवरील व्यक्तींनाच मिळणार लस, ओळखपत्र आवश्यक
 • कॉमॉर्बिडीटी असलेल्या लोकांनाही मिळणार लस, डॉक्टरांच पथक असणार हजर
 • लोकांची ने-आण करण्यासाठी सरकार करणार मदत

आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

 • निवडणूक आयोगाची मान्यता घेऊन बीएलओंना करणार लसीकरण मोहिमेत सहभागी
 • या काळात कोणतीच ओपीडी बंद रहाणार नाही, ओपीडींमध्ये सर्व एसओपींचं पालन केलं जाईल
 • लसीकरण कॅम्पबरोबर सर्व पीएचसी, सीएचसी हॉस्पिटलातही लसीकरण सुरू राहणार
 • राज्यात लसींचा तुटवडा अजिबात नाही
 • राज्यात आतापर्यंत युके स्ट्रेनचे फक्त ५ रुग्ण आढळलेत
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!