खंडपीठाचे कामकाज पूर्वीप्रमाणे करा!

दक्षिण गोवा वकील संघटनेच्या बैठकीतील ठराव

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : दक्षिण गोवा बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत पणजीतील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या कामकाजाच्या वेळेत करण्यात आलेल्या बदलाविषयी चर्चा झाली. नव्या वेळेनुसार दक्षिण गोव्यातील वकिलांना उच्च न्यायालयातील कामकाजासाठी जाणे अवघड होत असल्याने पुन्हा एकदा याआधीच्या वेळेनुसारच कामकाजाची सुरुवात करण्याबाबत खंडपीठाला निवेदन देण्याचा ठराव घेण्यात आला, अशी माहिती दक्षिण गोवा वकील असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. आंतानिओ क्लोव्हिस डिकॉस्टा यांनी दिली. दक्षिण गोवा वकील संघटनेच्या सर्वसाधारण बैठकीनंतर बोलताना डिकॉस्टा यांनी उच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या बदललेल्या वेळेमुळे अडचण होत असून बदलासाठी निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले.

हेही वाचाः ऐतिहासिक! पहिल्यांदाच देशात महिलेला फाशी, वाचा शबनमचा गुन्हा तरी काय ?

बदललेली वेळ दक्षिण गोव्यातील वकीलांसाठी अडचणीची

सध्या उच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळेत बदल करून ९ ते १२ वाजेपर्यंत व अर्ध्या तासाच्या अवधीनंतर पुन्हा १२.३० ते २.३० असे कामकाज सुरू करण्यात आले आहे. तर याआधीची कामकाजाची वेळ ही १०.३० ते १.३० व २.३० ते ४.३० अशी होती. दक्षिण गोवा वकील संघटनेकडून या वेळेला आक्षेप घेण्यात आलेला असून ही कामकाजाची वेळ दक्षिण गोव्यातील उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांसाठी अडचणीची ठरत आहे.

हेही वाचाः TRANSFER | राज्यातील अधिकाऱ्यांच्या विविध ठिकाणी बदल्या

वेळेत बदलाच्या ठराव

काणकोणातील वकिलाला उच्च न्यायालयात जाण्यासाठी सहा वाजताच घराबाहेर पडावे लागेल व कनिष्ट वकिलांकडे वाहन नसल्यास त्यांना सार्वजनिक वाहनांवर अवलंबून राहावं लागतं. त्यांनाही न्यायालयात वेळेत पोहोचणं शक्य होणार नाही. उच्च न्यायालयाच्या वेळेतील हा बदल हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या ठरावानुसार करण्यात आला आहे. या असोसिएशनमध्ये २०० ते २५० वकील आहेत. त्यात पणजीत प्रॅक्टिस करणारे २४ वकील आहेत. वेळेत बदलाच्या ठरावावेळी १४ जणांनी ठरावाच्या बाजूने तर १० वकीलांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले.

हेही वाचाः Important | आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या रशियन नागरिकाला वाचवण्यात यश

अ‍ॅड. डिकॉस्टा म्हणतात…

  • उच्च न्यायालयाने वेळेत बदल करताना पणजीव्यतिरिक्त गोव्यातील एकाही बार असोसिएशनशी चर्चा केलेली नाही. न्यायालयाच्या कामकाजाची वेळ ही राज्यातील सर्व वकिलांना योग्य अशी असणे आवश्यक आहे. त्यामुळे साडेदहा ही कामकाज सुरू करण्याची योग्य वेळ होती.
  • दक्षिण गोवा वकील संघटनेच्या सभेत मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय न्यायाधीशांना निवेदन सादर करण्याचा ठराव घेण्यात आला. प्रशासकीय न्यायाधीश दक्षिण गोव्यातील वकिलांची अडचण समजून घेतील व न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत पुन्हा बदल होईल, असा विश्वास आहे.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!