प्रजासत्ताक कोरियाने भारताला पाठवली वैद्यकीय मदत

अंतिम टप्प्यातील वैद्यकीय मदत नवी दिल्ली विमानतळावर विमानाने दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः भारत सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेशी निकराने सामना करत आहे. या कठीण काळात भारताला अनेक देशांनी सहाय्य केलं आहे. त्यातच भारताला प्रजासत्ताक कोरियाकडूनही मोलाची मदत मिळाली आहे.

हेही वाचाः मोरजीतील कुडाळकर, कार्दोज कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार

नवी दिल्ली विमानतळावर वैद्यकीय मदत दाखल

कोविड-19 विरोधात लढा देण्यासाठी प्रजासत्ताक कोरियाने भारताला वैद्यकीय मदत पाठविली आहे. अंतिम टप्प्यातील वैद्यकीय मदत नवी दिल्ली विमानतळावर विमानाने आणली गेली. गेल्या वीस दिवसांमध्ये तीन टप्प्यामध्ये वैद्यकीय मदत भारतामध्ये पाठविण्यात आल्याचं प्रजासत्ताक कोरियाचे गोव्यातील वाणिज्य दूतावास कार्यालयाचे ऑननरी कॉन्सल प्रशांत जोशी यांनी कळवलं.

हेही वाचाः DRDO ने बनवलेल्या 2DG औषधाची किंमत ठरली

8 हजार 500 अँटीजेन टेस्टिंग किटची मदत

प्रजासत्ताक कोरिया कोविड विरोधात लढा देण्यासाठी भारताला वैद्यकीय मदत पुरवित आहे. गुरुवारी 27 मे रोजी नवी दिल्ली येथे 8 हजार 500 अँटीजेन टेस्टिंग किट पाठविण्यात आल्यात. या किट्सद्वारे 2 लाख 12 हजार 500 चाचण्या करता येणार आहेत. कोरियाने आतापर्यंत तीन टप्प्यामध्ये एकूण 330 ऑक्सिजन कॉन्सेन्टेटर्स, 200 नेगेटिव्ह प्रेशर कॅरिअर, 200 ऑक्सिजन सिलेंडर्स, 18 हजार 500 अँटिजन डिटेक्शन किट, 10 व्हेंटिलेटर अशी वैद्यकीय मदत पाठविली आहे. 

हेही वाचाः राज्याचा कोविड पॉझिटिव्हीटी रेट होतोय कमीः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

यापूर्वी 9 आणि 12 मे रोजी केली होती मदत

कोरियन सरकारने यापूर्वी 9 आणि 12 मे रोजी दोन विमानांनी भारतात वैद्यकीय पुरवठा पाठविला होता. 230 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स, रेग्युलेटरसह 200 ऑक्सिजन सिलिंडर्स आणि 100 नेगेटिव्ह प्रेशर कॅरिअर इत्यादी वैद्यकीय साहित्य पाठवलं होतं. कोरानाच्या या भयावह स्थितीत प्रजासत्ताक कोरिया भारतासोबत आहे. प्रजासत्ताक कोरिया कोरोनाविरूद्ध लढाई लढण्यास भारताला मदतीचा हात पुढे केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!