मालवणचा आलाप आहे पदकविजेत्या मीराचा फिजियो !

आलाप सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जावडेकर यांचा नातू

कृष्णा ढोलम | प्रतिनिधी

मालवण : टोकियोमध्ये सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताला दुसऱ्याच दिवशी पहिलं पदक मिळालं आहे. मीराबाई चानू हीन वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक प्राप्त करत भारताला हा बहुमान मिळवून दिला आहे. मात्र भारताला मिळालेल्या या पहिल्या वहिल्या ऑलिम्पिक पदकानं मालवण वासीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.

आलाप योगेंद्र जावडेकर हा मीराबाई चानू यांचा फिजियो म्हणून काम करीत होता. आलाप हा सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. मुरलीधर जावडेकर यांचा नातू असून त्याचे वडील योगेंद्र हे बदलापूरला बालरोगतज्ञ म्हणून परिचित आहे. आलाप हा भारतीय चमूचा अधिकृत फिजिओ आहे.

हे यश मिळाल्यानंतर मालवणवासीयांचा उर अभिमानाने भरून आला. आलाप आणि पदकविजेती खेळाडू मीराबाई यांचा फोटो आणि हा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!