गोव्यात गांजा लागवड होणार कायदेशीर?

औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनाच विक्री

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : काही वर्षांपूर्वी उत्तर भारतात अनेक ठिकाणी गांजा मिळायचा. त्याची लागवडही केली जायची. मात्र, कालांतराने त्यावर बंधने आली. जागतिक आरोग्य संघटनेने गांज्याला औषध म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे अनेक देशांनी गांजा लागवडीला कायदेशीर दर्जा दिला आहे. गोव्यातही त्या अनुषंगाने हालचाली सुरु झाल्यात.

औषध निर्मितीसाठीच वापर?

गोव्यातील औषधी कंपन्यांसाठी गांजाची लागवड कायदेशीर करावी, असा प्रस्ताव अबकारी खात्याने दिला आहे. त्यावर आरोग्य खाते विचार करत आहे. त्यांनी याबाबत काही आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे आता या प्रस्तावावर सरकार फेरविचार करत आहे. ज्यांना आरोग्य खाते परवाना देईल, त्यांनाच गांजाची लागवड करता येईल. मात्र, त्यावर अबकारी खात्याचे नियंत्रण असेल. हा गांजा केवळ औषध तयार करणाऱ्या गोव्यातील कंपन्यांनाच विकता येईल.

सध्या तरी गांजा लागवड हा गुन्हाच!

गोव्यात सध्या गांज्याची लागवड करणे बेकायदेशीर आहे. रोपटी लावल्यास वा गांजा बाळगल्यास अटक होते. अलीकडे गोवा पोलिसांनी किनारी भागात प्रचंड प्रमाणात गांजा जप्त केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्णयानंतर मध्य प्रदेश, उत्तराखंड व उत्तर प्रदेश या राज्यांनी गांजा लागवड कायदेशीर केली आहे. लवकर इतर काही राज्येही तसा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कदाचित गोवाही त्यात असू शकते.

पाहा व्हिडीओ…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!