MARGAO MUNICIPALITY | घनश्याम शिरोडकरांनी दिला पदाचा राजीनामा…

घनश्याम शिरोडकरांची राजीनामा दिल्यानंतर स्पष्टोक्ती

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामतांनी भाजपमध्ये प्रवेश केला अन् मडगावच्या नगरपरिषदेमध्ये राजकीय स्थित्यंतरं घडू लागली. यातच मडगावचे नगराध्यक्ष पद घनःश्याम शिरोडकरांकडे गेल्यानं भाजपमध्येच आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. मुख्यमंत्र्यांनी थेट हस्तक्षेप केला असला तरीही प्रकरण शपथ घेण्यापर्यंत गेल्यानं गुरुवारी मडगाव नगराध्यक्ष घनःश्याम शिरोडकरांनी पदाचा राजीनामा दिला.
हेही वाचा:Photo Story | सांताक्रुजचे आमदार रुडोल्फ फर्नांडिस ॲक्शन मोडमध्ये…

शिरोडकरांविरोधात 19 सप्टेंबर रोजी अविश्वास ठराव दाखल

१६ सप्टेंबर रोजी मडगाव नगरपालिका निवडणुकीत गोवा फॉवर्डच्या पाठिंब्यावर निवडणुक लढवलेल्या घनश्याम शिरोडकरांनी भाजप गटाचे दामोदर शिरोडकर यांना 15-10 मतांनी पराभूत केलं. त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी मॉडेल मडगाव आणि भाजपच्या सर्व नगरसेवकांना बोलावत त्यांच्या अविश्‍वास ठरावावर सह्या घेतल्या. यानंतर शिरोडकरांविरोधात 19 सप्टेंबर रोजी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला.
हेही वाचा:भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने चौघांना चिरडले…

मी माझ्या पदाचा राजीनामा दिला

चार नगरसेवकांनी नगरपालिका संचालक कार्यालयात हा ठराव दिला. यावर नगराध्यक्ष घनःश्याम शिरोडकरांनी पदाचा राजीनामा दिलाय. 15 नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर या ठरावावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी बैठक बोलाविलेली असताना त्याच्या पूर्वसंध्येवर शिरोडकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याबाबत शिरोडकरांनी निवडणुकीच्यावेळी मला मतदान केलेल्या नगरसेवकांना मला धर्मसंकटात टाकायचे नाही. त्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलंय.
हेही वाचा:कर्तव्य बजावताना अग्नीशमन दलाच्या फायर फायटरचा मृत्यू…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!