‘मराठीला राजभाषेचा दर्जा द्या, नाहीतर….’

मराठीप्रेमींच्या बैठकीत आंदोलनाचा इशारा

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को : मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी मराठी गोवाची राजभाषा करावी, अन्यथा मराठी राजभाषा व्हावी यासाठी आंदोदन सुरु करावे लागेल, असा इशारा मराठीप्रेमीच्या बैठकीत देण्यात आला. वास्कोमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतलाय. मराठी राजभाषा प्रष्ठापन समितीचे अध्यक्ष गो. रा. ढवळीकर यांनी मराठीला फक्त अधिकार नको, तिच्या माथ्यावर राजभाषेचा टिळा हवा, असं म्हटलं. माजी आमदार विष्णू वाघ असते तर मराठी राजभाषा होण्यासाठी मोठे पाठबळ मिळाले असते, असे त्यांनी नमूद केलंय.

मुरगावात बैठक

मराठी राजभाषा मंच मुरगावतर्फे मेस्तवाडा येथील श्रीराम मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आलं होते. यावेळी गो.रा. ढवळीकर यांच्यासह गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर, गोवा मराठी अकदामचीचे कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत गवस, मोहन डिचोलकर, मच्छिंद्र च्यारी तसेच कांता तारी, अर्चना कोचरेकर, किशोर कोचरेकर, गुरुदास घाटवळ, विजय केरकर, शांताराम पराडकर आदी उपस्थित होते.

मराठी राजभाषा व्हावी यासाठी कोणकोणते प्रयत्न करण्यात आले यासंबंधी ढवळीकर यांनी माहिती दिली. गोव्याचे मंत्री, केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार यांच्या भेटी घेण्यात आल्या. माजी आमदार नरेश सावळ आणि स्वर्गीय विष्णू वाघ यांनी मराठीसाठी विधानसभेत चांगले प्रयत्न केले होते, असे त्यांनी सांगितले. मराठी राजभाषा व्हावी अशी राजकीय इच्छाशक्ती असेल तर मराठी राजभाषा होऊ शकते. मुख्यमंत्रीकडे काहीवेळा सदर प्रश्न नेण्यात आला. देशातील काही राज्यांमध्ये एकापेक्षा अधिक राजभाषा आहे. त्यामुळे गोव्यात मराठीला राजभाषेचे स्थान मिळण्याची गरज आहे. मराठी संपली तर आमचे अस्तिव संपेल असं ते म्हणाले.

चंद्रकांत गवस म्हणाले की,

मराठी राजभाषा होण्यासाठी राजकारण बाजूला ठेवण्याची गरज आहे. अन्याय खपवून न घेण्याची भावना लोकांमध्ये जागृत होण्याची गरज आहे. प्रखर आंदोलन होणे गरजेचे आहे. मराठी राजभाषा व्हावी हे सगळ्याची इच्छा आहे. त्या इच्छेचे धडाडीमध्ये परिवर्तन झाले पाहिजे. अर्चना कोचरेकर यांनी सरकारी कार्यालयांमध्ये मराठीचा वापर गायब होत आहे. मराठीच्या कार्यामध्ये सर्वानी सहभागी झाले पाहिजे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!