गोवा मुक्ती लढयात सहभागी असलेला मराठमोळा अभिनेता…

तब्बल 40 वर्षांचं समृद्ध 'अभिनय पर्व...समाजकार्यासाठी आयुष्य वाहिलेला 'मोठा माणूस'

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : आपल्या रांगडया अभिनयानं चित्रपटसृष्टीतला सर्वांत बेरकी खलनायक अजरामर करणारं एकमेव नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते निळू फुले. पडद्यावर दिसणारे आणि पडद्यामागं असणारे निळू फुले यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे. गोवा मुक्ती लढयासह संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि त्यानंतरही सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतलेलं हे वंदनीय व्यक्तीमत्व. डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यांचा हा संपूर्ण प्रवास नव्या पिढीसाठी विलक्षण प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांची दुरदर्शन सहयाद्रि वाहिनीवर प्रसारीत झालेली एक प्रदीर्घ मुलाखत खास आपल्यासाठी…

सौजन्य : दूरदर्शन सह्याद्रि वाहिनी
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!