म्हापसा अर्बन बँकेसंदर्भातली महत्त्वाची बातमी

कर्जदार आणि ठेवीदारांसाठी महत्त्वाचं आवाहन

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा : दिवाळखोरीत काढलेल्या म्हापसा अर्बन बँकेच्या 44 हजार 449 ठेवीदारांनी बँकेकडे 258 कोटी रूपयांवर दावा सादर केला आहे. भारतीय रीझर्व्ह बँकेमार्फत पुढील प्रक्रियेचा मार्ग सुरू करण्यासाठी इतर ठेवीदारांनी आपले दावे तसेच कर्जदारांनी कर्जाची रक्कम लवकरात लवकर बँकेकडे जमा करावी, असं आवाहन बँकेचे सरव्यवस्थापक शैलेंद्र सावंत यांनी केलंय.

एप्रिल 2020 मध्ये आरबीआयने म्हापसा अर्बन बँक दिवाळखोरीत काढली होती. सरकारी अधिकारी दौलत हवालदार यांची बँकेवर लिक्वीडेटर म्हणून नियुक्ती केली होती. बँकेच्या ठेवीदारांना ठेवीचे दावा करणारे अर्ज बँकेत सादर करण्याचे आवाहनही केलेलं.

डीआयसीजीसीचे नियम आणि अटींनुसार तसंच बँक बूकच्या आधारं दाव्यांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर पुढील प्रक्रीय केली जाणारे. जुलैमध्ये लिक्वीटेडरनी सार्वजनिक नोटीस जारी करून ही बाब स्पष्ट केली होती.

महत्त्वाची सूचना

लिक्वीड निधीसह बँकेकडे 230 कोटींची मालमत्ता आहे. शिवाय शासकीय मुल्यांकनानुसार बँकेकडे 58 कोटींची स्वतःची मालमत्ता असून 13 कोटींची बँकेकडे बिगर बॅकिंग मालमत्ता आहे. सुमारे 2 हजार 464 कर्जदारांकडे 51 कोटींची थकीत रक्कम आहे. यातील 2.91 कोटींची रक्कम कर्जदारांनी जमा केलीय.

करोना महामारीमुळे ठेवीदारांना बँकेत दावे करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झालाय. यातील बहुतेक ठेवीदार गोव्याबाहेर किंवा परदेशात आहेत. प्रत्यक्ष किंवा ईमेलसारख्या माध्यमातून ठेवीदारांचे दावे स्वीकारण्यात येतायत. सरव्यवस्थापक शैलेद्र सावंत यांनी ही माहिती दिली.

शैंलेंद्र सावंत यांनी म्हटलंय की…

बँकेच्या नियमानुसार केव्हायसी आणि इतर कागदपत्रांच्या आधारे 258 कोटींचा दावा करणारे दावे स्विकारण्यात आले आहेत. केव्हायसी निषकांचे पालन करून जवळपास 56 कोटींचे दावे अद्याप ठेवीदारांनी सादर केलेले नाहीत. केव्हायसी सादर न केलेल्या खातेधारकांनी 40 कोटींवर दावा केलेला नाही. येत्या आठ दिवसांत वैधानिक लेखा परीक्षणाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्याआधी ठेवीदारांनी दावे करण्याचं आवाहन आम्ही करीत आहोत. त्यानंतर सर्व यादी (डेटा) आरबीआयकडे (डीआयजीसीसी) सोपविण्यात येईल. त्यानंतर ऑडीट प्रक्रीया करून जीआयसीजीसीतर्फे ठेवीची परतफेड सुरू होईल.

हळदोणा शाखेत 11 लॉकर, मडगांव 60 लॉकर, दिवाड 6 लॉकर व कासावली एक लॉकर असलेल्या शाखांचा यात समावेश आहे. शाखा बंद झाल्यानंतर या लॉकर्स बँकेच्या मुख्य शाखेत हलविण्यात येतील. त्यापूर्वी लॉकर्सधारकांनी त्यांची मौल्यवान रक्कम नेऊन लॉकर्स बँकेकडे सुपूर्द करावीत असे आवाहनही करण्यात आलं आहे.

हेही वाचा –

कॅसिनोंना पणजी महापालिकेचा रेड सिग्नल

बँकेत पैसे भरायची, काढायची सोयच राहिली नाही, त्यावरही शुल्क लागणार! वाचा नवा नियम

चुकीला माफी नाही! कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!