अज्ञात वाहनाची धडक, ५ दुचाकी आणि दोन गाड्यांचं नुकसान

कधी कोण कुणाला ठोकर देईल, काहीच सांगता यायचं नाही!

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा : राज्यातील अपघाताचं सत्र सुरुच आहे. म्हापसातील डांगी कॉलनी एका अज्ञात वाहनानं दुचाकी आणि गाड्यांना ठोकर दिल्यामुळे मोठं नुकसान झालंय. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडलाय. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात वाहनांचं मोठं नुकसान झालंय.

काय झालंय नेमकं?

डांगी कॉलनी म्हापसा येथे गोधनेश्र्वर मंदिराजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकी आणि कारला ठोकर दिली. यात पाच दुचाकी व दोन चारचाकी वाहनांचं प्रचंड नुकसान झालंय. हा अपघात सोमवारी रात्री ११ च्या सुमारास घडला. ही वाहने रस्त्या शेजारी पार्क केली होती. अज्ञात वाहन चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या नावे फेक फेसबुक अकाऊंट करणाऱ्या संशयितास अटक

पाहा फोटो –

अधिक तपास सुरु

दरम्यान, या अपघाताप्रकरणी आता अधिक तपास सुरु आहे. नेमकी कुणी या गाड्यांना ठोकर दिली, याचा शोध घेतला जातोय. हा अपघात होता की जाणीवपूर्वक गाड्यांचं नुकसान करण्यात आलं, याचाही तपास केला जातोय.

हेही वाचा : गोव्याला येणाऱ्या मालाची अशी झाली ‘अपघाती लूट’

दरम्यान, आठवड्याभरापूर्वीत 22 वर्षीय तरुणीचा म्हापशातील विचित्र अपघातात दुर्देवी अंत झाला होता. गोवा फिरण्यासाठी आलेल्या हरियाणाच्या तरुणीवर काळानं घाला घातलाय. दुचाकीवरुन फिरताना झालेल्या विचित्र अपघातात ही तरुणी रस्त्यावर पडली. टेम्पोचं चाक या तरुणीच्या डोक्यावरुन गेलं आणि या तरुणीचा जागीच मृत्यू झालाय. धुळेर येथील काउंटो शोरुमसमोरील रस्त्यावर झालेल्या तीन वाहनांचा २४ जुलैला हा विचित्र अपघात झाला होता. या अपघातामध्ये रिया गुप्ता या 22 वर्षांच्या हरियाणातील तरुणीचा मृत्यू झाला. एका वर्तमान पत्राच्या टेम्पोचे चाक अंगावरून गेल्याने तिच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला आणि रिया गुप्ताचा जागीच मृत्यू झाला होता. आता पुन्हा म्हापशातील अज्ञात वाहनाच्या घटनेनं राज्याती रस्ते अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!