म्हापसा ते शिर्डी पदयात्रा

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी
म्हापसाः दरवर्षीप्रमाणे यंदाही म्हापसा टॅक्सी स्टॅंडवरून साई भक्त परिवारातर्फे म्हापसा ते शिर्डी अशी पदयात्रा काढण्यात आली आहे. मोठ्या संख्येने सर्व साईभक्त साईनाम घेत म्हापसा ते शिर्डी असा पायी प्रवास करत आहेत. ही पत्रयात्रा साईबाबांच्या पालखीसह शिर्डीपर्यंत चालली आहे.
साई भक्त परिवाराची ८ वी पदयात्रा
यावेळी पद यांत्रिकांनी ढोल, ताशा वाजवत ही पत्रयात्रा काढली आहे. म्हापशातील साई भक्त परिवाराची यंदाची ही ८ वी पदयात्रा आहे. या पदयात्रेत चालताना लाभणारी निसर्गाची सोबत, त्यामध्ये साईबाबांच्या होणार्या आरत्या, मधून भजनं आणि भगवंतांच्या, सद्गुरुंच्या नामाचा घोष यामुळे पदयात्रेत सगभागी झालेल्या भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

कधी सुरू झाली पदयात्रा?
साई भक्त परिवाराची ८ वी पदयात्रा म्हापसा टॅक्सी स्टॅंडवरील साईबाबा मंदिर इथून ८ जानेवारीला सुरू झाली. ही पदयात्रा २३ जानेवारीला शिर्डी येथे पोहोचणार आहे. या पदयात्रेतील साईभक्तांनी ५६७ किलोमिटर अंतर पार करत राहुरी गाठले आहे. आज ३८ किलोमिटरवर असणार्या राहता या ठिकाणासाठी ते निघाले आहेत. आणि तिथून पुढे ५ किलोमिटर अंतरावर असणार्या शिर्डी येथील समाधी मंदिरात ते २३ रोजी पोहोचतील.