छोट्या-मोठ्या दुकानदारांना मोठा दिलासा, म्हापसा मार्केटबाबत मोठा निर्णय

सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं मोठं आव्हान

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा : म्हापसा मार्केट पुन्हा पूर्ण क्षमतेनं सुरु होणार आहे. आज झालेल्या पालिकेच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय. कोरोना असल्यानं गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्केटमधील व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता.

लॉकडाऊन नंतरसुद्धा फारसे ग्राहक बाजारात फिरकले नव्हते. दरम्यान, आज झालेल्या बैठकीत म्हापसा मार्केट पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे या बाजारातील व्यावसायिकांना, छोट्या दुकानदारांना मोठा दिलासा मिळालाय. मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करुन म्हासपा मार्केट पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. म्हापसा पालिकेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. या बाजारातील छोट्या-मोठ्या दुकानदारांना या निर्णयामुळे फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.

दरम्यान, म्हापसा मार्केट सुरु झाल्यानंतर खरोखरंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं जातं का, हेही पाहणं महत्त्वाचंय. कारण म्हापसा मार्केट नेहमीच गजबजलेलं असतं. या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे मार्केट सुरु करण्याचा दिलासादायक निर्णय जरी घेण्यात आलेला असला, तरी कोरोनाचा संसर्ग पुन्हा होणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी लागणारे.

महत्त्वाचे मुद्दे –

– म्हापसा मार्केट पुन्हा पूर्ण क्षमतेनं सुरु होणार
– म्हापसा पालिकेच्या बैठकीत झाला निर्णय
– अटी-शर्थींसह म्हापसा मार्केट पुन्हा सुरु
– सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं मोठं आव्हान
– छोट्या-मोठ्या दुकानदारांना मोठा दिलासा

हेही वाचा –

दूधसागर पर्यटनाला सुरुवात, प्रतिसाद थंड

प्रतीक्षा संपली! इथे पाहा पुनवेचं खास गाणं, जे साकारलंय पेडण्यातील कलाकारांनी

म्हापशातील ‘त्या’ 153 घरांना मोठा दिलासा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!