म्हापसा बाजारपेठ पूर्ण क्षमतेने खुली; बुधवारपासून विक्रेत्यांना व्यवहार करण्याची मुभा

सरकारने कर्फ्यू नियमांमध्ये शिथिलता आणल्याने पालिका मंडळाकडून मार्केट सुरू करण्याचा निर्णय

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा: येथील मार्केट पालिका मंडळाने पूर्ण क्षमतेने सुरू केलं आहे. मार्केट खुलं झाल्यानंतर दोन महिन्यांनी रोजच्या विक्रेत्यांना मार्केटमध्ये सामावून घेण्यात आलं आहे. सरकारने कर्फ्यू नियमांमध्ये शिथिलता आणल्यामुळे पालिका मंडळाने मार्केटमधील दुकानं सुरू करण्यास मुभा दिली होती. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी मासळी आणि भाजी मार्केटही सुरू करण्यात आलं होतं. बुधवारपासून पालिका मंडळाने मार्केटमध्ये रोजच्या विक्रेत्यांना व्यवहार करण्याची मुभा दिली. त्यानुसार बहुतेक विक्रेत्यांनी आपला व्यवसाय पुन्हा सुरू केला.

हेही वाचाः गोवा मुक्तीला 60 वर्षं झाली तरीही हणखणे धनगर वाड्यावर रस्त्याचा पत्ता नाही

वरील पट्ट्यातील विक्रेत्यांना हटवून विक्रेत्यांच्या मागणीची पूर्तता

पालिका मंडळाने मंगळवारपासून या विक्रेत्यांना बाजारपेठेत व्यवहार करण्याची सूचना केली होती. पण शहरात जागोजागी, खास करून हळदोणा प्रासार ते जुने आझिलो हॉस्पिटलपर्यंत असलेल्या विक्रेत्यांना प्रथम हटवण्यात यावं आणि त्यानंतरच आम्ही व्यवहार सुरू करण्यास तयार असल्याची भूमिका विक्रेत्यांनी घेतली होती. त्यामुळे पालिकेने सकाळी वरील पट्ट्यातील विक्रेत्यांना हटवून विक्रेत्यांच्या मागणीची पूर्तता केली.

हेही वाचाः जनसुनावणीवेळी दक्षिण गोव्यातील नागरिक आक्रमक

भाजी आणि मासळी मार्केटमधील विक्रेते झाले होते नाराज

बाजारपेठ बंद असल्याचा फायदा घेत अनेक विक्रेत्यांनी हळदोणा प्रासार ते आझिलो हॉस्पिटलपर्यंतच्या पट्ट्याच व्यवसाय थाटला होता. भाजी आणि मासळी मार्केट सुरू होऊनही या ठिकाणी मासळी आणि भाजी विकली जात होती. त्यामुळे भाजी आणि मासळी मार्केटमधील विक्रेत्यांना नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचाः पुन्हा एकदा रस्ता खचला! 10 दिवसांतली दुसरी घटना

शहराच्या आवारात रस्त्याकडेला व्यवसाय थाटणार्‍यांवर कारवाई

पालिका मंडळाने बाजारपेठ पूर्ण क्षमतेने सुरू केली आहे. दुकानदार तसंच विक्रेत्यांनी करोनाचे नियम पाळून व्यवसाय करावा, गर्दी टाळावी, बाजारपेठेत गर्दी होऊन परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास मार्केट बंद करण्याची पाणी ओढवेल. त्यामुळे सर्वांनी दक्षता घ्यावी. तसंच शहराच्या आवारात रस्त्याकडेला व्यवसाय थाटणार्‍यांवर कारवाई केली जाईल, असं नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!