रंगपंचमीला गालबोट! रंग खेळून अंघोळीसाठी गेलेला बारावीचा विद्यार्थी बुडाला

धामाडे आकय येथे युवक बुडाला

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा : रंगपंचमी खेळून धामाडे आकय थिवी येथे खाडीच्या पाण्यात आंगोळीसाठी चार युवक उतरले होते. यातील शिवराज सोमाप्पा शिवबसन्नावर याचा बुडून मृत्यू झाला. मूळचा बेळगावचा असणाऱ्या शिवराजचं वय 19 वर्ष असून तो करासवाड्यात राहत होता. मयत युवक इयत्ता बारावीचा विद्यार्थी होता.

हेही वाचा – धारवाड अपघातातून बचावलेल्या तिनं सांगितलं की, जाग आली तेव्हा मैत्रिणींचे मृतदेह….

हेही वाचा – Accident | भरधाव ट्रक थेट घरात घुसला कारचही अपघातात नुकसान

ही घटना सोमवारी दुपारी 2.30 च्या सुमारास घडली. मयत आणि त्याचे मित्र मिळून चार जण रंगपंचमी खेळून आंगोळीसाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली. धामाडे येथे मानसी जवळ खाडीत चारही युवक आंगोळ करण्यासाठी उतरले. पाण्यात पोहताना मयत शिवराज गटांगळ्या खाऊ लागला आणि काही वेळाने पाण्यात अदृश्य झाला. त्याच्या मित्रांनी पाण्यात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांनी तेथील रहिवासी आणि म्हापसा पोलिसांना घटनेची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अनील पोळेकर व सहकार्‍यांनी घटनास्थली धाव घेतली. म्हापसा अग्नीशमन दलाचे उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी स्थानिकांच्या मदतीने सांयकाळी खाडीच्या पाण्यातून मयताचा मृतदेह काढला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉमध्ये पाठवून दिला आहे.

हेही वाचा – ACCIDENT | दुचाकीवरील ताबा सुटल्याने झाला स्वयंअपघात

दरम्यान शिवबसन्नावर कुटूंबात आई वडील आणि बहीण असून ते करासवाडा टाकयेकडे भाड्याच्या खोलीत राहतात. मयत इयत्ता बारावीचा विद्यार्थी असून हल्लीच त्याने पूर्व परीक्षा दिली होती.

हेही वाचा – राज्यातील अपघातांबाबतची ही आकडेवारी पाहिलीत का?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!