म्हापशात अनेक ठिकाणी तुंबले पावसाचे पाणी…

खोर्ली येथील उसपकर जंक्शनवर पूरसदृश स्थिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : शहरासह बार्देश तालुक्याला गुरुवारी दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे ओहोळ आणि नाले दुथडी भरून वाहू लागले. सकाळी तासभर कोसळलेल्या पावसामुळे खोर्ली-म्हापसा येथील उसपकर जंक्शनवर पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले, तर काहींच्या घरातही पाणी शिरले.
हेही वाचा:कॅसिनो, ऑनलाईन गेमिंगबाबत ‘जीएसटी’कडून दिलासाचे संकेत ‍

काँक्रिटचा नाला बांधल्यापासून ही स्थिती गंभीर

गणेशपुरी मैदान परिसरात खडपावाडा कुचेली व करासवाडा टाकी भागात आकय, तार बस्तोडा जंक्शन आणि नामोशी गिरी येथील रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तालुक्यातील काही सखल भागांत पावसाचे पाणी साचल्याने लोकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण झाला. उसपकर जंक्शनवरील श्यामसुंदर कारेकर यांच्या घरात पाणी घुसले. डोंगर उतरणीवरून येणार्या पावसाच्या पाण्यामुळे या जंक्शनवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्याचा फटका रहिवाशांना बसत आहे. काँक्रिटचा नाला बांधल्यापासून ही स्थिती गंभीर बनत चालली आहे. स्थानिक आमदार तसेच पालिका मंडळ या प्रश्नी तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेस नेते संजय बर्डे यांनी संताप व्यक्त केला. 
हेही वाचा:राजस्थानमध्ये महिनाभरासाठी संचारबंदी, ‘हे’ आहे कारण… ‍   

टाकाऊ वस्तू गटारात टाकल्यामुळे तुंबते पाणी

आम्ही यंदा शंभर टक्के गटारे व नाल्यांची साफसफाई केली आहे. तरीही लोक आपल्या घरातील टाकाऊ सामान आणि झाडे झुडपे कापून गटारात फेकतात. त्यामुळे पावसाळ्यात असे पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. लोकांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखावी व गटारांत टाकाऊ साहित्य टाकू नये, असे आवाहन नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी केले आहे.   
हेही वाचा:कोरोनामागोमाग आणखी भयंकर आजाराची साथ… ‍   

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!