मनुष्यबळ महामंडळाकडून साडेचार हजार रोजगार निर्मिती

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती; सुरक्ष रक्षक म्हणून काम करण्याची गोंयकारांना संधी

Goan Varta Live | प्रतिनिधी


पणजी: गोमंतकीय युवकही कष्टाची समजली जाणारी कामं करु शकतो याची जाणीव सरकारला आहे. याचमुळे गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या माध्यमातून अडीच हजार जणांना सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीची हमी देत काम करण्याची संधी सरकारनेच उपलब्ध केल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितलं.

हेही वाचाः कोकण रेल्वेचा प्रवास आता आणखी वेगात !

सुरक्ष रक्षक म्हणून काम करण्याची गोंयकारांना संधी

सुरक्ष रक्षक म्हणून काम करण्याची ही संधी आजवर इतर राज्यातून येऊन घेतली जात असे. ती संधी गोंयकारांनाच मिळावी असा सरकारने विचार केला आणि महामंडळाच्या माध्यमातून ही सेवा देणं सुरु केलं. त्यासाठी पोलिस प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणाची सोय केली. त्या माध्यमातून आज अडीच हजार जणांना रोजगार मिळाला आहे. गरज निर्माण झाल्यावर या संधीतही वाढ होणार आहे. गोमंतकीय तरुण तरुणी हे काम करणार नाही, ते करणार नाही असं सांगणारे अनेकजण आहेत. पण त्यांच्या हातांना योग्य असं काम देणारं कोणी नाही. त्यांच्या हाताला सरकारने आता काम दिलं आहे. हाऊसकिपिंग अटेंडेंट म्हणून २ हजार जण काम करतात. म्हणजे सरळपणे साडेचार हजार जणांच्या रोजगाराचा प्रश्न सरकारने सोडवला आहे.

हेही वाचाः जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे सत्तरी तालुक्यात पूरसदृश्य स्थिती

स्व. पर्रीकरांच्या कार्यकाळात महामंडळाची स्थापना

या महामंडळाची स्थापना तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात झाली तेव्हा मी त्या महामंडळाचा संचालक होतो. असं महामंडळ अस्तित्वात आणून गोमंतकीय तरुण तरुणींना रोजगाराची संधी देण्याची संकल्पना मीच स्व. पर्रीकर यांच्याकडे मांडली होती. परप्रांतीय येथे येऊन ही कामं कंत्राटी पद्धतीने करत होते. आता गोमंतकीय तरुण तरुणींना कायम नोकरीच्या माध्यमातून या कामांतून रोजगार मिळाला आहे. सरकारचा तीन वर्षं हा कालावधी सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कमी असला, तरी बहुतांश प्रश्न सोडवण्यासाठी पावलं सरकारने टाकली आहेत, असं त्यांनी नमूद केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!