मनोज परब म्हणतात मुख्यमंत्रीच जबाबदार

शेळ-मेळावलीवासियांनी आयआयटी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मोर्चा काढला

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपईः
शेळ मेळावली प्रकरण चिघळण्यासाठी मुख्यमंत्रीच जबाबदार असल्याचं रेव्होल्यूशनरी गोवन्स संघटनेचे नेते मनोज परब यांनी आरोप केलाय. शेळ-मेळावलीवासियांनी आयआयटी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मोर्चा काढला. आयआयटी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी काढलेल्या मोर्चाला त्यांनी वाळपईत भेट दिली.

शेळ मेळावलीत पेटली मोर्चाची आग

शेळ-मेळावलीवासियांनी पोलिसांविरोधात रोष व्यक्त करताना रस्त्यावर ठाण मांडली. त्यांचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला. आमची जमिनी आमची पोषणकर्ती आहे. आमच्या जमिनी आम्ही देणार नाही, म्हणत लोक पेटून उठले. पेटून उठलेल्या लोकांना नियंत्रीत करण्यासाठी हजारो पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिस आणि स्थानिकांच्या झटपटीत वाळपईचे पीआय सागर एकोस्कर यांच्यासह काही पोलिसांनी महिलांना धक्काबुक्की केली. काही महिलांना ढकलून खाली पाडले. अक्षरशः त्यांना पायदळी तुडवले. यामुळे या मोर्चाला एक वेगळंच वळण लागलंय. मोर्चाची आग अजूनच भडकली.

पीआय सागर एकोस्करविरुद्ध कारवाई करा… अन्यथा,

महिलांच्या अंगावर पाय ठेवून पुढे जाणारे वाळपईचे पीआय सागर एकोस्करला निलंबित करण्याचा हट्टच जणू आता शेळ मेळावलीवासियांनी धरलाय. पेटून उठलेल्या लोकांना नियंत्रीत करताना पीआय सागर एकोस्कर यांच्यासह काही पोलिसांनी महिलांना धक्काबुक्की केली. काही महिलांना ढकलून खाली पाडले. अक्षरशः त्यांना पायदळी तुडवले. यामुळे या मोर्चाला एक वेगळंच वळण लागलंय. मोर्चाची आग अजूनच भडकली. या प्रकारानंतर त्यासाठी ते अडून बसलेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः वाळपईत येऊन शेळ मेळावलीवासियांची भेट घेतल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. तसंच वाळपईचे पीआय सागर एकोस्करविरुद्ध एफआयआर दाखल करावी, अशा दोन मागण्या शेळ मेळावलीवासियांनी सरकार समोर ठेवल्यात. या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही, असा इशारा शेळ मेळावलीवासियांनी दिलाय.

शेळ मेळावलीवासियांना विविध संघटनांचा पाठिंबा

शेळ मेळावलीवासियांनी काढलेल्या मोर्च्याचं आम आदमी रेव्होल्यूशनरी गोवन्स संघटनेचे नेते मनोज परब यांनी समर्थन केलंय. लोकांना नको असेल तर प्रकल्प रेटू नये, असं ते यावेळी म्हणालेत. आम आदमी रेव्होल्यूशनरी गोवन्स संघटनेसोबतच आम आदमी पार्टी तसंच कॉंग्रेसच्या नेत्यांनी शेळ मेळावलीवासियांची भेट घेतली. त्यांनीही शेळ मेळावलीवासियांना जाहीर पाठिंबा दर्शविलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!