3 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी मणिपालमध्ये लसीकरण

लस घेण्यासाठी करावं लागणार कोविन किंवा सेतू अ‍ॅपवर रजिट्रेशन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवता होणार असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं होतं. पण लसींचा तुटवडा असल्याने हा लसीकरणाचा कार्यक्रम पुढे गेलाय. मात्र दोनापावला येथील मणिपाल रुग्णालयात ३ मे पासून १८ वर्षांवरील लोकांचं लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मणिपाल हॉस्पिटलकडून देण्यात आलीये. त्यामुळे इच्छुकांना लस घेण्यासाठी कोविन किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपवर नोंदणी करण्याचं आवाहन मणिपाल हॉस्पिटलकडून करण्यात आलंय.

हेही वाचाः कोविड-19 उपचारासाठी ऑक्सिजन काँसंट्रेटरचा वापर

निवेदन प्रसिद्ध करून दिली माहीती

लसीकरण सुरू होणार असल्याची माहिती देताना मणिपाल व्यवस्थापनाने एक निवेदन प्रसिद्ध केलंय. निवेदनात म्हटलं, मणिपाल रुग्णालय 18 वर्षांवरील व्यक्तींचं कोविड-19 लसीकरण सुरू करत आहे, हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे.

हेही वाचाः ‘आप’चे ऑक्सिमित्र अभियान

लस घेण्यासाठी करावं लागणार रजिट्रेशन

सोमवार, 3 मे पासून सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत केंद्रात कोवक्सिनची लस उपलब्ध असणार आहे. प्रति लसीची किंमत 1360 असेल, असं मणिपाल रुग्णालयाने म्हटलंय. लस घेण्यासाठी लाभार्थ्यांना कोविन किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपवर नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतरच लस घेता येईल, असंही हॉस्पिटलकडून नमूद करण्यात आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!