वेर्ला येथे गाड्यांवर कोसळला आंबा

चार गाड्यांचं नुकसान; बुधवारी सकाळची घटना

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसाः लोपीसवाडा वेर्ला येथे आंब्याचा भला मोठा वृक्ष कोसळल्याने चार वाहनांचे नुकसान झालं आहे. यात सुमारे चार लाखाची हानी झाली आहे.

हेही वाचाः संतोष, रवींकडून आज मंत्र्यांची वैयक्तिक शाळा!

बुधवारी सकाळी कोसळलं झाड

ही घटना बुधवारी सकाळी 7.15 च्या सुमारास घडली. पाऊस वार्‍यामुळे भला मोठा आंब्याचा वृक्ष कोसळला. या झाडाखाली तेथील लोकांनी आपल्या गाड्या पार्क केल्या होत्या. कोसळलेला वृक्ष या कार गाड्यांवर कोसळला. त्यामुळे कार गाड्यांची मोठे नुकसान झालं.

हेही वाचाः कोविडबाधितांचे मृत्यू लपवले नाहीत

चार कार्सचं नुकसान

मोहन दाभाळे यांची जीए 03 एच 7033 ही वेगनार कार, गोकुळदास दाभाळे यांची जीए 03 सी 8054 ही आल्तो कार, महेश मळणकर यांची एमएच 07 एजी 5238 ही आल्तो कार व तर दत्ताराम साळगांवकर यांची जीए 03 झेड 1817 ही टोयोटा कार या चार गाड्यांचं नुकसान झालं.

हेही वाचाः मडगावात वजन-मापे खात्याची कारवाई

अग्नीशमन दलाने झाड केलं दूर

घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्नीशमन दलाचे उपअधिकारी अशोक परब, इप्रिमो डायस, प्रकाश घाडी व संजू कोरगांवकर या जवानांनी झाड कापून बाजूला केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!