मांद्रे गट काँग्रेसकडून समाजसेवेतून सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रयत्न

वैद्यकीय उपकरण परतावा योजनेंतर्गत मांद्रे दांडोसवाडा येथील अनिल नाईकांना उपलब्ध करून दिली वैद्यकीय खाट

मकबूल | प्रतिनिधी

पेडणे: मांद्रे गट काँग्रेसतर्फे मांद्रे दांडोसवाडा येथील अनिल नाईक यांना वैद्यकीय खाट देण्यात आली. दरम्यान सामाजिक बांधिलकी जपण्याचं कार्य मांद्रे गट काँग्रेस आपल्या कार्याद्वारे करीत असल्याचं सचिन परब म्हणाले.

5 जुलै रोजी दिली खाट

मांद्रे गट काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी ५ जुलै रोजी अनिल नाईक यांच्या निवास्थानी भेट देऊन त्यांना त्यांच्या मागणीनुसार खाट उपलब्ध करून दिली. वैद्यकीय उपकरण परतावा योजनेंतर्गत अनिल नाईक यांच्या कुटुंबियांकडे ही खाट सुपूर्द करण्यात आली. यावेळी या शिष्टमंडळात उत्तर जिल्हा सचिव आणि काँग्रेसचे युवा नेते सचिन परब, युवक काँग्रेसचे सरचिटणीस सुरज रेडकर, अरुण वस्त, प्रदीप सावंत, संतोष सावंत, राजू गावंडे, दिपक नाईक, संदीप नाईक आणि पक्षाचे अन्य निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचाः मार्केट बंद ठेवण्यास एसजीपीडीएतील व्यापाऱ्यांचा विरोध

मांद्रे गट काँग्रेसकडून सामाजिक बांधिलकी जपण्याचं कार्य

मांद्रे गट काँग्रेसतर्फे वैद्यकीय उपकरणे परतावा उपक्रम मांद्रे मतदारसंघांत राबवला जात असल्याने त्याचाच एक भाग म्हणून मांद्रे दांडोसवाडा येथील अनिल नाईक यांना वैद्यकीय खाट देण्यात आली. दुर्दैवाने हल्लीच त्यांना अपघात झाल्याने डॉक्टरकडून आराम करण्याचा सल्ला दिल्याने त्यांना खाटेची गरज असल्याचं उद्देश शेट्ये यांनी आमच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कोणतीच हयगय न करता त्वरित त्यांना खाट उपलब्ध करून दिली. प्रामाणिकपणे सामाजिक बांधिलकी जपण्याचं कार्य मांद्रे गट काँग्रेसकडून केलं जात आहे. काँग्रेस पक्ष जरी एक राजकीय पक्ष असला, तरी एखादा समाजपयोगी उपक्रम राबवताना राजकारण न करता प्रामाणिक भावनेतून समाजकारण केलं जात आहे. यामध्ये पक्षाची संघटनात्मक वाढ आणि लोकांपर्यंत पोचण्याचा उद्देश आहे. काही विरोधक त्याचं अवडंबर करतात. परंतु त्याकडे लक्ष न देता मनात शुद्ध हेतू ठेवून काम केल्यानं मनाला समाधान मिळत असल्याचं सचिन परब म्हणाले.

सचिन परबांचे आम्ही उपकारी

याप्रसंगी अनिल नाईक यांच्या पत्नीने सांगितलं की, माझ्या पातीला अपघात झाल्यामुळे त्यांचं उठणं-बसणंही कठीण होऊन गेलंय. त्यामुळे मदतीची आम्हाला गरज होती. सचिन परब यांनी आमची गरज हेरून आम्हाला मदतीचा हात दिल्यानं आम्ही कुटुंबीय त्यांचे उपकारी आहोत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!