मांद्रे मतदारसंघातील सर्वसामान्यांना मिळणार मोफत सरकारी ऑनलाईन कागदपत्रे

जीत आरोलकरांची माहिती; मांद्रे मगोप कार्यालयात सेवा सुरू

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः मांद्रे मतदारसंघातील सर्व गरजूंना सरकारची आवश्यक सर्व ऑनलाईन कागदपत्रे विविध कामांसाठी लागतात, ती या पुढे आपल्या मांद्रे कार्यालयातून मोफत उपलब्ध करून देणार असल्याचं मगोप नेते जीत आरोलकरांनी शुक्रवारी मांद्रे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

हेही वाचाः माणुसकीच्या ओलाव्यानं पुन्हा बहरला ‘मोना-मोनी’चा संसार !

मांद्रेतील मगोप कार्यालयात सेवा सुरू

सरकारने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सरकारी कागदपत्रे जसे की शेतकऱ्यांसाठी लागणारा एक-चौदाचा  उतारा, बेरोजगार युवकांसाठी रोजगार नोंदणी तसंच विविध कामांसाठी लागणारी विविध सरकारी कागदपत्रे आता ऑनलाईन उपलब्ध केली आहेत. सर्वसामान्यांना ही कागदपत्रे मिळवण्यासाठी बरीच धावपळ करावी लागते. ती सोय आता आरोलकरांनी मगो पक्षाच्या वतीने मांद्रे कार्यालयात उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू केल्याची माहिती दिली. सरकारने महत्त्वाची कागदपत्रे आता ऑनलाईन पद्धतीने केल्यामुळे काहींना ती मिळवण्यात खूप अडचणी येतायत. या सर्व अडचणी लक्षात घेऊन ही सुविधा आपल्या कार्यालयातून मोफत उपलब्ध करून दिली जाईल, असं आरोलकर म्हणालेत.

हेही वाचाः मगोपचे जीत आरोलकर, प्रवीण आर्लेकर चर्चेत

वेळप्रसंगी घरपोच सेवा

काहींना जर कार्यलयात येण्यात अडचण असेल, त्यांनी कोणती कागदपत्रं हवीत हे कार्यालयात कळवल्यास त्यांना ती त्या घरपोच केली जातील, असंही आरोलकर म्हणालेत. सध्या कोरोना महामारीमुळे प्रत्येकाने आपाली तसंच आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी.  या काळात मांद्रे उदर्गत आणि मगोपतर्फे मांद्रे मतदारसंघात  विविध योजना,  उपक्रम राबवले जातायत. सरकार आपल्या पद्धतीने योजना राबवतेय. मात्र लोकप्रतिनिधी त्या लोकांपर्यंत पोहोचवत नाहीत. मात्र आम्हाला या योजना राबवताना कोणतंही राजकारण करायचं नाही. काही लोकप्रतिनिधी स्वतःला जनतेचा नोकर म्हणवतात. मात्र कृतीतून कधी तसं वागत नाहीत, असा टोला आरोलकरांनी लगावलाय.

हेही वाचाः CRIME | पैसे देत नाही म्हणून बहिणीच्या डोक्यात घातली क्रिकेट बॅट

मान्सूनपूर्व कामे अजूनही अर्धवट

मांद्रे मतदारसंघात आजही पाण्याची समस्या आहे. त्यावर अजूनपर्यंत उपाय योजना केलेल्या नाहीत. तुयेतील नियोजित पाणी प्रकल्पाला चालना देण्याची गरज आहे. मांद्रेतील अनेक रस्ते पाण्याखाली जातायत. रस्त्यांच्या बाजूची गटार व्यवस्था कोलमडलीये. मान्सून राज्यात दाखल होऊनही त्यावर उपाय योजना केलेल्या नसल्याने आरोलकरांनी नाराजी व्यक्त केलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!