कर्नाटकात जाण्यासाठी टेस्ट किंवा पहिला डोस बंधनकारक

गोव्यातून चोर्ला घाटमार्गे कर्नाटकात जातानाही होतेय तपासणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

बेळगाव : कर्नाटकात जाण्यासाठी आता 72 तासांच्या आतील आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र किंवा कोविड लसचा किमान एक डोस घेतलेला असणं कर्नाटक सरकारनं बंधनकारक केलंय. हा नियम बस, टॅक्सी, रेल्वे आणि विमानानं प्रवास करणाया सर्व प्रवाशांसाठी बंधनकारक आहे. दरम्यान, गोवा राज्यातुन चोर्ला घाटमार्गे कर्नाटकात प्रवेश करणा-या प्रवाश्यांकडंही आता आरटीपीसीआर प्रमाणपत्र असणं बंधनकारक करण्यात आलंय. यापूर्वी हा नियम गोव्यासाठी नव्हता. कणकुंब चेकपोस्टवर त्याची तपासणी सुरू झालीय.

सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस विषाणूचा प्रादूर्भाव मोठया प्रमाणावर आढळत आहे. नजीकच्या महाराष्ट्र राज्यात याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळं खबरदारी म्हणून 72 तासांच्या आतील आरटीपीसीआर निगेटिव्ह सर्टीफिकेट किंवा कोविड लसचा किमान एक डोस घेतलेला असणं बंधनकारक आहे.

दरम्यान, डेल्टा प्लस विषाणूच्या पार्श्वभूमीवर बेळगावमधील संशयित 15 जणांचे नमुने बेंगलोर इथं तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं प्रशासनानं सुटकेचा निश्वास सोडलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!