मल्ल्या, मोदी, चोक्सी यांची 9,371 कोटींची संपत्ती सरकारी बँका-केंद्राकडं हस्तांतरित

'ईडी'नं ट्वीट करून दिली माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : भारतातील बॅंकांचे कोटयवधी रूपये बुडवून परदेशात पळून गेलेले मद्यसम्राट विजय मल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी यांच्या मालमत्तेतुन 9,371 कोटींची संपत्ती सरकारी बँका आणि केंद्राकडं हस्तांतरित केल्याचं व्टिट ईडीनं केलंय. दरम्यान, आतापर्यंत ईडीनं या तिघांची 18 हजार 170 कोटी इतकी संपत्ती जप्त केलीय. बॅंकांना झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ही रक्कम 80.45 टक्के इतकी आहे. जप्त करण्यात आलेल्या एकुण रकमेपैकी मोठा हीस्सा सरकारी बॅंका आणि केंद्र सरकारच्या ताब्यात दिल्याचंही ईडीनं म्हटलंय.

मद्यसम्राट विजय मल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी हे सध्या परदेशात पळून गेलेले मोस्ट वाॅन्टेड थकबाकीदार आहेत. त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिघांनीही भारतातील बॅंकांना हजारो कोटींचा चुना लावलाय.

‘ईडी’नं दिलेल्या माहितीनुसार, विजय मल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी यांनी बॅंकांना 22 हजार 585 कोटींचा चुना लावलाय. त्यापैकी 18 हजार 170 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!