प्रवेश शुल्क 50 टक्के कराः एनएसयूआय

उच्च शिक्षण संचालकांना निवेदन सादर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने महाविद्यालयांमधील विद्यार्थी प्रवेश शुल्क ५० टक्के करावे या मागणीसाठी उच्च शिक्षण संचालकांना निवेदन दिलं. सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून ५० टक्के शुल्क आकारण्यात यावं, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

करोनामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. लोकांकडे आपल्या मुलांचं शुल्क भरायला पैसे नाहीत म्हणून प्रवेश शुल्क ५० टक्के करावं, असं एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी म्हटलं आहे.

हा व्हिडिओ पहाः VIOLENCE AGAINST WOMEN | महिन्याकाठी महिलांवरील अत्याचाराच्या 20 घटना

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!