राज्यात कोरोना रुग्णवाढ होत असताना पेडण्यात अंदाधुंद दगडफेक आणि लाठीचार्ज झाला

नागझर पेडणेमध्ये का झाली दगडफेक?

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : मोपा विमानतळ आणि हायवेला तीव्र विरोध केला जातो आहे. ज्या गोष्टी शेळ-मेळावलीमध्ये घडल्या होत्या त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा पेडण्यात होताना पाहायला मिळते आहे. नागझर पेडणेमध्ये आज संघर्ष पाहायला मिळालाय. आधी पोलिसांवर अंदाधुंद दगडफेक आणि त्यानंतर पोलिसांनी प्रतिहल्ला करत केलेला लाठीचार्ज या घटनेनं वातावरण एकूणच ढवळून निघालंय.

हेही वाचा – BREAKING | केंद्राचा मोठा निर्णय! 1 मेपासून १८ वर्षांवरील सगळ्यांचं कोरोना लसीकरण

नेमकं काय झालं?

मोपा विमानतळ लिंक रोडसाठी भूसर्वेक्षणाचं काम सध्या सुरु आहे. या कामासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्थानिकांचा विरोध असल्यानं सर्वेक्षणाच्या कामात अडथळ येऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. दरम्यान, सोमवारी बंदोबस्त असणाऱ्या पोलिसांवर आधी दगडफेक करण्यात आली. स्थानिकांनी ही दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दगडफेकीनंतर पोलिसही सावध झाले. त्यांनी तात्काळ प्रत्युत्तराखातर लाठीचार्ज केला.

हेही वाचा – CORONA UPDATE | ‘या’ मंत्र्याने केली चक्क ६७ वेळा कोरोना चाचणी!

नागझर पेडणेमध्ये झालेल्या या संपूर्ण धुमश्चक्रीमध्ये पोलिसांसह स्थानिकही जखमी झाल्याची माहिती मिळतेय. मोपा विमानतळासोबत स्थानिकांनी हायवेलाही तीव्र विरोध केला आहे. गेल्या दोन ते तीन आठवड्यांपूर्वी तीव्र आंदोलनही करण्यात आलं होतं. स्थानिक सत्ताधारी नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनंही करण्यात आली होती. मात्र सरकारनं या सर्व विरोधाला केराची टोपली दाखवल भूसर्वेक्षणाचं काम सुरु ठेवल्यानं स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळतेय.

हेही वाचा – Video | कोरोना ब्रेकिंग ! 17 मृत्यू, 940 नवे रुग्ण, याहीपेक्षा चिंताजनक आकडेवारी ‘ही’ आहे

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!