धारबांदोड्यात कार झाडावर आदळली, दोघांवर काळाचा घाला

भीषण अपघातात दोघांवर काळाचा घाला

शेखर नाईक | प्रतिनिधी

धारबांदोडा : राज्यातील अपघातांचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाही आहे. धारबांदोड्यात भीषण अपघात झालाय. कारच्या झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंतजनक असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कुठे घडला अपघात?

पिळये-धारबांदोड्यात मंगळवारी रात्री अपघात झाला. एक स्विफ्ट कार झाडावर आदळली. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जातंय. या अपघातात दोघांवर काळानं घाला घातलाय. यामध्ये दोघा तरुणांचा मृत्यू झालाय. एकाचा जागीच मृत्यू झाला. जागीच मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव राजदीप राजेंद्र नाईक असं असून त्याचं वय ३० वर्ष होतं. तो उसगावमध्ये राहत होत. तो मूळचा डिचोलीचा असल्याची माहिती मिळतेय.

जखमीवर उपचार सुरु

तर दुसऱ्या जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. सर्वेश रामदास गावडे असं त्याचं नाव असून वय २७ वर्ष होतं. आपेव्हाळ प्रियोळमधील सर्वेशचा उपचारादरम्यान जीएमसीमध्ये अखेरचा श्वास घेतलाय. तर तिसऱ्या जखमी तरुणावर उपचार सुरु आहे. तोही गंभीररीत्या जखमी आहे. शुभम सोमनाथ गावस असं त्याचं नाव असून त्याचं वय २८ वर्ष असल्याची माहिती मिळतेय. हा मूळचा धारबांदोड्याचा आहे. या अपघातामुळे मृत्यू झालेल्या दोघा तरुणांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा चक्काचूर झालाय.

अपघातात जागीच मृत्यू झालेला राजदीप नाईक

हेही वाचा – धारवाड अपघातातून बचावलेल्या तिनं सांगितलं की, जाग आली तेव्हा मैत्रिणींचे मृतदेह….

धुक्याचा कहर! भीषण अपघात, 13 जणांवर काळाचा घाला

….शॉर्टकटने गेले नसते तर कदाचित अपघात टळला असता!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!