कंत्राटी परिचारिकांना सेवेत कायम करा

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी
म्हापसाः करोना महामारीच्या काळात आरोग्य खात्यातील प्रत्येक कर्मचार्यांचं योगदान अमूल्य आणि महत्त्वाचं ठरत आहे. या खात्यात सुमारे सहाशे कंत्राटी परिचारिका सेवा बजावत असून मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी या सर्वांना कायमस्वरूपी सरकारी सेवेत सामावून घ्यावं, अशी मागणी माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी केली आहे. शिवोली भाजप मंडळातर्फे शिवोलीतील आरोग्य खात्यातील कर्मचारी विजय मांद्रेकर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी माजी मंत्री मांद्रेकर बोलत होते.
हेही वाचाः 3 जूनपासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू; वाचा कधी कुणाचं लसीकरण
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला जिल्हा पंचायत सदस्य सानिशा तोरस्कर, पंच सदस्य अभय शिरोडकर, माजी सरपंच दिगंबर आगारवडेकर, अनिता च्यारी, सविता गोवेकर, शिवा चोडणकर तसंच इतर मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचाः सरकारने ‘त्या’ दोन लाखांचा हिशोब द्यावा
आरोग्य कर्मचाऱ्यांचं कार्य महान
अनेक आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून, आघाडीवर येऊन कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्याच्या या कार्याला तोड नाही. राज्यात आज आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे. तरीही सेवेत असलेले कर्मचारी विश्रांती न घेता, आपल्या जीवाची पर्वा न करता इतरांचा जीव वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत. या महामारीतून लवकरच आपण मुक्त होऊ असा आशावाद मांद्रेकरांनी यावेळी व्यक्त केला. तसंच करोना महामारीत आरोग्य खात्याच्या कर्मचार्यांनी दिलेल्या योगदानाची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.