नवीन पदे भरण्यापूर्वी कंत्राटी अभियंत्यांना सेवेत कायम करा

बांधकाम खात्यातील भरतीबाबत गोवा फॉरवर्डची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः सरकारने सार्वजनिक बांधकाम खात्यात मोठ्या प्रमाणात विविध अभियंता पदांच्या भरतीसाठी जाहिराती केल्या आहेत, पण याच खात्यात गेली अनेक वर्षं कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या अभियंत्यांना मात्र अजूनही तुटपुंजा पगार दिला जात आहे. त्यांना अगोदर सेवेत कायम करा, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे जॉन नाझारेथ यांनी मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचाः कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात भाजप सरकार अपयशी; राज्यपालांनी सरकार बरखास्त करावे

कंत्राटी अभियंत्यांना सेवेत कायम करा

माहिती तंत्रज्ञान खात्यांतर्गत २७ अभियंत्यांना सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कंत्राटी तत्त्वावर नोकरी दिली होती. अजूनही हे अभियंते कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत. या अभियंत्यांना अगोदर सेवेत कायम करावं, यासाठी आम्ही मुख्य सचिवांना निवेदन देणार असल्याचं जॉन नाझारेथ यांनी यावेळी सांगितले.

सध्या सरकारकडून मोठ्या प्रमाणात पदांच्या भरतीसाठी जाहिराती

सध्या सरकारकडून मोठ्या प्रमाणात पदांच्या भरतीसाठी जाहिराती केल्या जात आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यात विविध पदांसाठी या जाहिराती करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाजप सरकारचा हा आपल्या कार्यकर्त्यांना नोकऱ्या देण्याचा डाव आहे. गेली अनेक वर्षे या खात्यामध्ये अनेक अभियंते कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत. त्यांना अगोदर सेवेत कायम करावे, मग नवीन पदांसाठी भरती करावी तसंच या खात्यात खाण अभियंत्यांची पदेही काढण्यात आली आहेत.

हेही वाचाः निवृत्त न्यायाधीश भास्करराव शेट्ये यांचं निधन

भाजपच्या खास कार्यकर्त्याची सोय : नाझारेथ

सार्वजनिक बांधकाम खात्यात खाण अभियंत्याची गरज आहे का, असा सवाल करून जॉन नाझारेथ म्हणाले, भाजपने आपल्या एका खास कार्यकर्त्यासाठी हे पदाची जाहिरात केल्याचं समोर आलं आहे. याची आम्ही गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे चौकशी करणार आहोत.      

हा व्हि़डिओ पहाः Politics | BJP | माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांचं सूचक वक्तव्य

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!