म्हावळिंगे-डिचोलीत पोलिसांनी उधळला पट जुगाराचा डाव

सहा जणांना अटक; 6 हजार 400 रुपये जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात गुन्हेगारी, बलात्कार या आणि अशा गुन्हेगारीच्या घटनांसोबतच जुगार या प्रकरणांमध्येही वाढ होताना दिसतेय. शुक्रवारी रात्री पोलिसांच्या गुन्हा शाखेकडून डिचोली भागात चालणाऱ्या पट जुगारावर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचाः निवृत्त न्यायाधीश डॉ. गुस्तांव फिलीप कुटो यांंचं निधन

कुठे केली कारवाई?

डिचोली तालुक्यातील म्हावळिंगे भागात चालणारा पट जुगाराचा डाव पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री उधळून लावला आहे. शुक्रवारी रात्रीच्या अंधारात पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पट जुगार चालणाऱ्या ठिकाणी दाखल होत ही धडक कारवाई केली आहे.

सहा जणांना घेतलं ताब्यात

पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाई दरम्यान कारवाईच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या जुगार खेळणाऱ्या सहा जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी 16 हजार 400 रुपये जप्त केले आहेत.

कुणाला केली अटक?

पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या सहा जणांमध्ये पांडुरंग गावस (41, माटणे-सिंधुदुर्ग), राजीव नाईक (42, पारवाडा-अस्नोडा), जगदीप बाणावलीकर (51, मयते-अस्नोडा), सत्यवान मळगावकर (53, बोर्डे-डिचोली), रवी वारखंडकर (43, कोणीवाडा-कोलवाळ) आणि संदेश गाड (मुळगाव-डिचोली) यांचा समावेश आहे.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | MURDER | चंद्रकांत बांदेकर खून प्रकरणाचा उलगडा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!