गोवा बनावटीची ५० लाखांची दारु जप्त, बांदा पोलिसांची कारवाई

बांदा पोलिसांची कारवाई

अर्जुन धस्के | प्रतिनिधी

बांदा : गोव्यातून पुण्याकडे होणार्‍या गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात बांदा पोलीसांनी आज सकाळी बांदा चेकपोस्टवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे तब्बल ५० लाख रुपयांचा दारुसाठा व ५ लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण सुमारे ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

beer

सदर कारवाई पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी टी. टी. कोळेकर, प्रथमेश पोवार यांनी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास केली. दारुसाठा मोजमाप करण्याचे काम सुरु असून मुद्देमाल आकडा अजूनही वाढण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली.

गेल्या काही महिन्यातील पोलीसांनी केलेली ही मोठी दारु कारवाई आहे. या कारवाईत ६०० हून अधिक गोवा बनावटीचे विविध ब्रँडचे बॉक्स जप्त केले आहेत.

हेही वाचा – बापरे! हत्येनंतर पत्नीचे केले 22 तुकडे

गोवन वार्ता लाईव्ह विशेष – हेही वाचा – अर्थ बजेटचा Live Update

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!