अदिती बर्वे, चिप्पलकट्टी यांना महाराष्ट्राचे साहित्य पुरस्कार

उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठीचा स्व. यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः महाराष्ट्र सरकारने गुरुवारी उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठीचे (२०१९ सालासाठी) स्व. यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील ३४, तर गोव्यातील दोघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहेत.

कोण आहेत पुरस्काराचे मानकरी?

गोव्यातील लेखिका, कवयित्री प्रा. अदिती बर्वे यांना त्यांनी मराठीत अनुवाद केलेल्या पुस्तकासाठी प्रतिष्ठेचा ‘बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. तर गोवा आकाशवाणीवर सेवा देऊन निवृत्त झालेले गोपाळ चिप्पलकट्टी यांना ‘प्राचीन भारतीय संस्कृती : मुलाधारांच्या शोधात’ या इतिहास विषयक पुस्तकासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. बर्वे यांनी रूपाली मावजो कीर्तनी यांच्या ‘सौदीतले दिवस’ या पुस्तकाचं मराठीत भाषांतर केलं. पुण्यातील पद्मागंधा प्रकाशनाने सदर पुस्तक प्रकाशित केलं आहे.

पुरस्काराचं स्वरूप

प्रा. अदिती बर्वे आणि गोपाळ चिप्पलकट्टी यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराचं स्वरूप रोख १ लाख रुपये, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन

प्रा. अदिती बर्वे यांना जाहीर झालेल्या बृहन्महाराष्ट्र साहित्य पुरस्काराबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विट करून त्यांचं स्वागत केलंय. रुपाली मावजो लिखित ‘सौदिताले दिन’ या मराठी पुस्तकाच्या अनुवादासाठी धेंपे महाविद्यालयातील इंग्रजीच्या प्रा. आदिती बर्वे यांना महाराष्ट्र शासनातर्फे प्रतिष्ठेचा ‘बृहन्महाराष्ट्र साहित्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याबद्दल ऐकून मला आनंद झाला. प्रा. अदिती बर्वे यांचं अभिनंदन, असं मुख्यमंत्री म्हणालेत.

दरम्यान, कवी केशवसूत पुरस्कार मंगेश नारायणराव काळे, राम गणेश गडकरी पुरस्कार शफाअत खान, हरी नारायण आपटे पुरस्कार मनोज बोरगावकर यांना प्राप्त झाला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!