शिवाजी महाराजांचे विचार आजही प्रेरणादायी – मुख्यमंत्री

महाराष्ट्र मंडळ गोवाच्या वतीने हिरोजी इंदुलकर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः देशाच्या सर्वांगीण विकासासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत आणि यापुढील काळातही राहतील. छत्रपतींचा आदर्श घेऊन जिद्द आणि चिकाटी बाळगून यशस्वी व्हा, असा संदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला. महाराष्ट्र मंडळ गोवाच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलरकॉन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश परब, विशेष अतिथी म्हणून इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून दिपप्रज्वलनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्या अगोदर मिरामार सर्कल ते युथ होस्टेल दरम्यान फोंड्यातील जगदंब ढोल ताशा पथकाच्या जयघोषात पालखी मिरवणूक पार पडली.

हेही वाचाः पणजी महापालिकेसाठी भाजप पॅनेलचे उमेदवार जाहीर, कुणाला संधी? कुणाला डावललं?

हिरोजी इंदुलकर पुरस्काराने सन्मान

या कार्यक्रमाला जगभर कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञ आणि व्यक्तींचा हिरोजी इंदुलकर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यात सौदी अरेबियामध्ये भारतीयांसाठी कार्यरत राहिलेले प्रवीण मानकर, नासा हनिवेल एज्युकेटर लीना बोकील, अंटार्टिकाचे शास्त्रज्ञ डॉ. बबन इंगोले, ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी दौलत हवलदार आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या डॉ. नानासाहेब थोरात यांना हिरोजी इंदुलकर पुरस्कार प्रधान करण्यात आले. या कार्यक्रमात हिरोजी इंदुलकर यांचे वंशज समीर इंदुलकर, संतोष इंदुलकर यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांचा सन्मान

मुख्यमंत्री म्हणाले, जिद्द, चिकाटी आणि स्वाभिमानाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि हे स्वराज्य जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत राहिले. त्यामुळे ते आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मंडळाचे अध्यक्ष विशाल गायकवाड यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला.

हेही वाचाः करोनातील सहा महिन्यांत राज्यात ९,५६५ बालकांचा जन्म

कलरकॉनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश परब म्हणाले,

छत्रपतींनी उभारलेलं स्वराज्य हे जनतेच्या कल्याणाचं स्वराज्य होतं. त्यामुळे नव्या पिढीला ते समजणं गरजेचं आहे. कारण यातूनच प्रेरणा घेऊन नवी पिढी देशहितासाठी कार्यरत राहील.ॉ

हेही वाचाः शिरोडकरांमुळे स्थानिक कलाकारांची समाजाला ओळख – गोविंद गावडे

‘छत्रपती शिवरायांचं कार्य’

यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ पांडुरंग बलकवडे यांचं ‘छत्रपती शिवरायांचं कार्य’ या विषयावर व्याख्यान झालं. यावेळी बोलताना बलकवडे म्हणाले, छत्रपतींनी केवळ स्वतःच्या कल्याणासाठी राज्य उभारलं नव्हतं. अत्यंत प्रतिकूल परीस्थितीत निजामशाही, आदिलशाही आणि मोगलांशी लढाया करत नवं मराठा साम्राज्य उभारलं. निजामशाही आणि आदिलशाहीला जनता कंटाळली होती. अशावेळी स्वाभिमान जागा करत महाराजांनी उभारलेलं कार्य हे केवळ जनतेच्या हितासाठीचं होतं. त्यातूनच प्रेरणा घेऊन आपण कार्यरत राहिलं पाहिजे.

या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून इतिहास अभ्यासक सचिन मदगे उपस्थित होते. यावेळी सिंधुदुर्गातले शिवसेनेचे नेते संदेश पारकर राणी उपस्थिती दर्शवत मंडळाच्या कामाला शुभेच्छा दिल्या. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या कला आणि महाराष्ट्राचे कला-संस्कृती त्यांचा दर्शन घडवणारा संस्कृती कार्यक्रम पार पडला. यावेळी विकास पालांडे, विजय कुडाळकर, आमोद पाटील, संजय चव्हाण, नानासाहेब झाकणे, श्रद्धा खलप, संयुक्ता गावडे, अंजू देसाई उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!