डायरेक्ट चंद्रार फेम महादेव जोशी यांच्या निधनानं अनेकजण हळहळले

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : ‘डायरेक्ट चंद्रार’ या शब्दांमुळे गाजलेले सत्तरीतील पत्रकार व समाजसेवक महादेव जोशी यांचं निधन झालंय. सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं अनेकजण हळहळलेत. फेसबुकवरील वृत्तविषयक रोखठोक व्हिडिओंसाठी ते प्रसिद्ध होते. डायरेक्ट चंद्रार या त्यांच्या शब्दांनी सगळ्यांच्या मनात एक खास जागा केली होती.

गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती. जीएमसी आणि वाळपई इस्पितळात त्यांच्यावर उपचार चालू होते.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

हेही वाचा – मेळावलीमध्ये तणाव! पोलिसांसमोर आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी

काय म्हणाले दिगंबर कामत?

युवा सामाजीक कार्यकर्ते महादेव जोशी यांच्या निधनाने मला तीव्र दु:ख झाले. त्यांचे कुटूंबिय, मित्र परिवार व चाहत्यांच्या प्रती मी सहवेदना व्यक्त करतो. महादेव जोशी हे स्वाभिमानी गोमंतकीय होते व अन्याया विरूद्ध आवाज उठविण्याचे काम त्यांनी कर्तव्य भावनेने केले. “डायरेक्ट चंद्रार” या त्यांच्या पंच लाईन ने ते सर्वांच्या ह्रदयात कायम राहतील.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!