मडगाव अर्बन बँकेसंदर्भातली मोठी बातमी, निर्बंधांत वाढ

खातेधारकांच्या पैशांचं काय?

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

ब्युरो : मडगाव अर्बन बँकेच्या निर्बंधात वाढ करण्यात आली आहे. पुन्हा एकदा आणखी तीन महिन्यांचे निर्बंध बँकेवर घालण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध लादल्यानं खातेधारक हवालदिल झालेत. त्यामुळे खातेधारकांचे पैसे कधी मिळणार, हा प्रश्न कायम आहे.

खातेधारकांच्या पैशांचं काय?

मडगाव अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेची २६ डिसेंबर रोजीची स्थगित करण्यात आलेली सभा 21 फेब्रुवारीला व्हर्च्युअल पद्धतीने घेण्यात आली होती. या सभेत लेखापालाची नेमणूक व पुढील वर्षांचा अर्थसंकल्प मंजूर करणे या दोनच विषयांवर चर्चा करण्यात आलेली. या सभेला संचालक मंडळासह २५ ते ३० जणांनीच सहभाग दर्शवला होता. मात्र यात खातेदारांचे पैसे परत करण्यावर कोणतीच चर्चा झाली नव्हती. अशातच आता निर्बंध वाढवल्यानं खातेधारक हवालदिल झालेत.

money
money

मडगाव अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची स्थगित करण्यात आलेली ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी व्हर्च्युअल पद्धतीने पार पडली. याआधी २६ डिसेंबर रोजी सकाळी गोमंतक भंडारी समाज हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत आक्रमक झालेल्या खातेदारांनी थकीत कर्जदारांची नावे, जामीनदारांची नावे व त्यांना कर्ज देणाऱ्या संचालकांची नावे जाहीर करावी, तसेच ही सभा तत्काळ स्थगित करून १० जानेवारीला पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली होती.

हेही वाचा – कर्नाटकच्या जलस्रोत मंत्र्यांवर लैंगिक शोषणाचा सनसनाटी आरोप, व्हिडीओही समोर

तारीख पे तारीख

यानंतर व्यवस्थापकीय संचालकांनी खातेदारांची मागणी मान्य करतानाच आठ दिवसांत थकीत कर्जदारांची नावे बँकेतून घेण्यास खातेदारांना सांगितले होते. तर मडगाव अर्बनच्या खातेदारांना अजूनही सहा महिन्यात केवळ ३० हजार रुपये काढण्यास मिळतात. यामुळे अनेकांना गरजेच्या वेळी त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. याबाबत संचालक मंडळाकडून भारतीय रिझर्व्ह बँकेकडे कोणता पत्रव्यवहार करण्यात आला याची माहिती द्यावी, अशी मागणीही या सभेत खातेधारकांनी केली होती. कर्ज घेऊन न फेडलेल्या कर्जदारांची यादी उपस्थित खातेधारकांनी मागितल्याने ही सभा स्थगित करून ती यादी उपलब्ध करून १० जानेवारीला १० वा. पुन्हा सभा आयोजित करण्यात आली होती.

मात्र, मडगाव अर्बन बँकेतर्फे १० जानेवारी हॉलबाहेर नोटीस लावून करोनाच्या पार्श्वभूमीवर सभा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळीही संतप्त खातेधारकांनी आपणच सभा घेत प्रसंगी संचालकांना घेराव घालण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा – हसत हसत आत्महत्या करणाऱ्या आयशाची काळीज हेलावणारी गोष्ट

रविवारी मडगाव अर्बन बँकेकडून व्हर्च्युअल पद्धतीने घेण्यात आलेल्या सभेत ३५ जणांनी नावनोंदणी केली होती. तर २५ ते ३० जणांनी सहभाग दर्शवला. यात अर्थसंकल्पाला मंजुरी व लेखापालची नियुक्ती या दोन विषयांवर चर्चा करून सभा आटोपती घेण्यात आल्याचे खातेदारांनी सांगितले.

उपाध्यक्ष महात्मे काये म्हणाले होते…

21 फेब्रुवारीची बँकेची सभा ही २६ डिसेंबर रोजी स्थगित राहिलेली सभा असल्याने त्यात अजेंड्यांवरील उर्वरित दोन विषयच घेण्याचे ठरले होते. खातेदारांना त्यांचे पैसे मिळण्यासाठी बँके प्रयत्नशील असून सरकारशी चर्चा सुरू आहे. मार्च आधी बँकेवरील निर्बंध मुदतीत वाढ तसेच खातेदारांना आणखी पैसे देण्यासही परवानगी मिळण्याची आशा आहे. खातेदारांना एकूण ५० हजारांपर्यंत पैसे परत करण्याबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले आहे. निर्बंध लागल्यानंतर ज्यांनी ३० हजारपर्यंत पैसे काढले त्यांना आणखी २० हजार रुपये काढता येतील व असे झाल्यास १५ हजारांपर्यंत खातेदारांची खाती बंद होऊ शकतील.

Top 25 | सकाळच्या महत्त्वाच्या घडामोडी झटपट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!