‘स्वयंपूर्ण गोवा’ अंतर्गत उसगावात ३० पाडेल्यांना मशिन्स प्रदान

उसगाव पंचायत सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोव्यात सध्या स्वयंपूर्ण मिशनचे वारे जोराने वाहू लागले असून स्वयंपूर्ण गोवा मिशनचा एक भाग म्हणून उसगाव-फोंडा येथे आज तीस युवकांना माडावर चढण्याची मशिन्स देण्यात आली. उसगाव पंचायत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात स्थानिक सरपंच नरेंद्र गावकर, उपसरपंच संगीता दहीफोडे आणि स्वयंपूर्ण मित्र तथा उपसंचालक पंचायतराज प्रसिद्ध नाईक यांच्या हस्ते मशिन्स देण्यात आली.

यावेळी बोलताना सरपंच नरेश गावकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यात स्वयंपूर्ण गोवा मिशन अंतर्गत जोमाने काम सुरु असल्याचे सांगून तळागाळात स्वयंपूर्ण मित्र काम करत असल्याचे सांगितले.

प्रसिद्ध नाईक यांनी गावातील लोक स्वयंपूर्ण होत असल्याचे पाहून आनंद होत असल्याचे सांगून उसगाव भागातील जनतेने मोठ्या प्रमाणात योजनेचा फायदा करून घेण्याचे आवाहन केले.

सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून गौरव पोकळे यांच्या आस्थापनातर्फेही ही मशिन्स देण्यात आली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!