सर्वसामान्यांना मोठा फटका! पुन्हा घरगुती गॅसच्या दरात वाढ; ‘हे’ आहेत नवे दर

15 दिवसांत 50 रुपयांनी महागला गॅस सिलेंडर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः वाढत्या महागाईमध्ये सामान्य जनतेला आणखी एक झटका बसला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 15 दिवसांत विना सब्सिडी एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला आहे. आज 1 सप्टेंबर रोजी एलपीजी सिलेंडरमध्ये 25 रुपयांची वाढ झाली आहे. याआधी पेट्रोलियम कंपन्यानी 18 ऑगस्ट रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती.

हेही वाचाः ६० टक्के कुटुंबांना आजपासून मोफत पाणी

आता घरगुती गॅल सिलिंडरसाठी मोजावे लागणार 898.50

राज्यात आता 14.2 किलोग्रॅमच्या विना सब्सिडी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर आता 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरचा दर 898.50 रुपये इतका झाला आहे.

14.2 किलोग्रॅम असणाऱ्या नॉन सबसिडी एलपीजी गॅस सिलेंडरसाठी आणखी 25 रुपये भरावे लागणार आहेत. या किंमती आजपासून लागू होणार आहेत. वाढत्या किंमतीसह राज्यात आता घरगुती गॅस सिंलेडर 873.50 वरून 898.50 रुपये इतका झाला आहे.

हेही वाचाः ऑगस्टमध्ये कोविडचे ५४ बळी; २,९०३ जणांना लागण

कुठल्या शहरात सिलेंडरचे दर किती

दिल्लीत गॅस सिलेंडरचा नवा दर 884.5 रुपये

मुंबईमध्ये गॅस सिंलेडर दर 884.5 रुपये

कोलकातामध्ये 911 रुपये

चेन्नईत 900.5 रुपये

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या होत्या. मे आणि जूनमध्ये सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. एप्रिलमध्ये सिलेंडरच्या दरात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती.

हा व्हिडिओ पहाः Crime | किरकोळ घरगुती वाद चिघळून थेट जीवघेणा हल्ला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!