महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेल आणि विजेनंतर आता गॅस सिलिंडरही महागला

तब्बल 50 रुपयांनी सिलिंडर महागला!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : संपूर्ण भारतात एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज वाढ असताना आता त्यात गॅस सिलिंडरचीही भर पडली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतींसोबत आता गॅसची किंमत तब्बल 50 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता 733 रुपयांवर मिळणारा एलपीजी सिलिंडर 783 रुपयांवर जाऊन पोहोचलाय. याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे. अनेकांचं आर्थिक गणित महागाईच्या भडक्यामुळे आधीच कोलमडलेलं असताना आता त्यात महागलेल्या गॅस सिलिंडरचीही भर पडली आहे.

फक्त राज्यातच नव्हे, तर देशातच एकूण इंधन दरवाढीनं सगळ्याच गोष्टींचे दर वाढवले आहेत. भाज्यांसोबतच सगळ्यांच गोष्टी महागल्या आहेत. अशातच आता एलपीजी सिलिंडरची किंमत वाढल्याचा परिणाम थेट लोकांच्या खिशावर होणार आहेत. फक्त गोवा राज्यातच नव्हे तर दिल्लीतही गॅस सिलिंडरचे दर वाढलेत. सोमवारी दुपारी 12 वाजल्यापासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.

भोपाळमध्ये पेट्रोलची सेन्च्युरी

कच्च्या तेलाचे भाव वाढल्यानं थेट इंधन दरवाढ दररोज होतेच आहे. अशातच मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये पेट्रोलनं सेन्च्युरी मारली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर शंभर रुपयांच्या पार गेलेत. त्यामुळे जुन्या पेट्रोलच्या मशिन्स बंद करण्याची वेळ आली आहे. दरम्यान ज्यापद्धतीनं सध्या इंधनासोबत सर्व गोष्टींचे दर वाढत आहेत, त्यामुळे सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. आता जगायचं तरी कसं, हा गंभीर प्रश्न सर्वसामान्यांच्या पुढे उभा राहिलाय.

महिन्याला किंमती बदलते

भारतात LPG गॅसची किंमत तेल कंपन्या ठरवतात. भारतात जवळपास अधिकाधिक घरांमध्ये LPG कनेक्शन आहेत. या गॅसचा उपयोग खासकरुन स्वयंपाकासाठी केला जातो. LPG गॅसच्या किमतीत झालेली वाढ ही खास करुन सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम करते. कारण सध्यस्थिती वाढलेल्या तेलाचे भाव आणि गॅसच्या किमतीचा फटका हा सर्वसामान्यांना बसतो. दरम्यान सरकार अनुदानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतं. त्याचबरोबर तेल कंपन्या नव्या योजना चालवून ग्राहकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करतात.

हेही वाचा –

आणखी एक घोटाळा! मेटा स्ट्रीपने कॅनरा बँकेला 90 कोटींना फसवले

ऐन फेब्रुवारीतही पावसाच्या सरी बरसणार?

वीज कनेक्शन वाचवायचंय तर ही बातमी वाचाच

FASTAG | नो फास्ट टॅग, भरा दुप्पट टोल

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!