महागाईचा मोठा झटका, स्वयंपाकाचा गॅस महागला

गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांनी वाढ; 1 जुलैपासून नवे दर लागू

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः आर्थिक चिंता वाढवणारी ही बातमी आहे. घरगुती सिलेंडरचे दर 25 रुपयांनी वाढले आहेत. आधीच इंधनाची दरवाढ झालेली असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसलीय. त्यात आता घरगुती सिलिंडरचा दर वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे हे मात्र नक्की…

हेही वाचाः फक्त 3 महिन्यांचे कंत्राट दिल्याने पॅरा शिक्षकांमध्ये नाराजी

1 जुलैपासून नवे दर लागू

गुरुवारपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे विनाअनुदानित गॅस सिलींडरसाठी ग्राहकांना आता पणजीत 834.50, तर दक्षिण गोव्यात 848.50 रुपये मोजावे लागणार आहेत.

हेही वाचाः जुलैपासून स्मार्टफोन, कार, फ्रीज, टीव्ही महाग होणार?

फेब्रुवारीमध्ये 3 वेळा केली दर वाढ

गॅस सिलिंडरच्या किमतीत फेब्रुवारीमध्ये तीन वेळा वाढ करण्यात आली होती. ४ फेब्रुवारीला २५ रुपये, १५ फेब्रुवारीला ५० आणि २५ फेबु्रवारीला पुन्हा २५ रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर १ मार्च रोजी सिलिंडरदरात पुन्हा २५ रुपयांनी वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर १ एप्रिल रोजी मात्र सिलिंडर दरात १० रुपयांनी कपात करण्यात आली होती.

हेही वाचाः अक्षरकलावारी । अक्षरकलेमधून उलगडणार पंढरीची वारी

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे  दर बदलतात

सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे  दर बदलतात. यापूर्वी 1 मे रोजी गॅस कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केला नव्हता. यापूर्वी एप्रिलमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 10 रुपयांची कपात केली गेली होती, तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये किंमती वाढविण्यात आल्या. आता १ जुलैपासून पुन्हा २५ रुपयांनी दरवाढ करण्यात आल्याने गॅस सिलिंडर महागला आहे.

हेही वाचाः कप्पू शर्माच्या मानधनात पुन्हा घसघशीत वाढ !

इतर शहरांमध्ये एलपीजीची किंमत

मुंबईतही  14.2 किलो एलपीजी सिलिंडरचा दर आता 834.50  रुपये आहे, तर आतापर्यंत  809 रुपये होता. कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरचा दर 835.50 रुपयांवरून वाढून 861 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे. तर चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी आजपासून 850.50 रुपये द्यावे लागतील, जे कालपर्यंत 825 रुपये होते. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी 872.50 रुपये द्यावे लागतील. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एलपीजीसाठी  841.50 द्यावे लागतील.

हेही वाचाः अभिमानास्पद! बुद्धिबळातील ‘युवा ग्रँडमास्टर’

एलपीजी सिलिंडर यावर्षी 140.50 रुपयांनी महागला 

दरम्यान, वर्षाच्या सुरुवातीस 2021 म्हणजेच जानेवारीत दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत  694 रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये प्रति सिलिंडरमध्ये 719 रुपये झाली. 15 फेब्रुवारीला ही किंमत 769 रुपये करण्यात आली. यानंतर 25 फेब्रुवारीला एलपीजी सिलिंडरची किंमत कमी करुन 794 रुपये करण्यात आली. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत कमी करून 819 रुपये करण्यात आली. एप्रिलच्या सुरूवातीला दहा रुपयांची कपात झाल्यानंतर दिल्लीतील घरगुती एलपीजीची किंमत 809 रुपयांवर गेली होती. एका वर्षात एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये 140.50 रुपयांनी वाढ झाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!