‘लव्ह जिहाद’ तक्रारीवरून गोव्यात पहिली अटक

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : लव्ह जिहादचं षडयंत्र रचूूून युवकानं तब्बल पाच वर्षं आपलं लैैंगिक शोषण तसेच फसवणूक केल्याची तक्रार युवतीने फोंडा पोलिसांत केली होती. या प्रकरणी पोलिसांनी नवाज साब देसाई (28, रा. कुळे) यास अखेर अटक केली.
कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी भाजपशासित राज्यं लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी आग्रही असताना गोव्यात ही कारवाई झाल्यानं गोवा सरकारही त्याच दिशेने वाटचाल करत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जातेय.
युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, 2015 मध्ये कुळे पोलिस ठाण्याच्या गणेश विसर्जनावेळी या युवकाशी तिची ओळख झाली. तो जीप गाडीवर ड्रायव्हर होता. मी तेव्हा दहावीत शिकत होते. त्यानंतर त्या युवकाने माझ्याशी जवळीक वाढवली. पुढे मैत्री झाली. एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले.
आधी जबरदस्तीने चुंबन, मग केला सेक्स…
युवतीने तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, एका भेटीदरम्यान या युवकाने लग्नाच्या आणाभाका घेतल्या. अनेक भूलथापा मारल्या. मग माझी तयारी नसताना चुंबन घेतलं. पुढे आणखी एका भेटीदरम्यान माझ्या मनाविरुद्ध माझा लैंगिक उपभोगही घेतला.
…मग मी त्याच्या प्रेमात बुडून गेले!
लग्नाचं आमिष दाखवल्यानं मी त्याच्या प्रेमात आकंठ बुडाले. आमच्या वरचेवर भेटीगाठी होऊ लागल्या. कधी त्याच्या जीपमध्ये, तर कधी एखाद्या हॉटेलमध्ये आम्ही एकरुप होऊ लागलो. मी त्याला सर्वस्व अर्पण केलं होतं.
…पण त्यानं दगा दिला!
एके दिवशी आम्ही मंगेशीत जाऊन देवदर्शन केलं. मग एका ठिकाणी रात्र घालवली. लग्नाच्या आणाभाका सुरूच होत्या. पण तो टाळाटाळ करत होता. अखेर हा विषय त्याने आपल्या कुटुंबियांसमोर ठेवला. पण त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्या युवकानं त्यानंतर माझा फोन घ्यायचं बंद केलं. मी पोलिस तक्रारीची भीती घातली. तेव्हा तो लग्नाला तयार झाला. पण तोपर्यंत हा विषय पोलिसांपर्यंत पोहोचला होता. मग आम्ही सहमतीने तक्रारीचा विषय मिटवला.
डॉक्टरकडून उपचारांनंतर वागणूक बदलली
नोव्हेंबर 2020 मध्ये मला लैंगिक संबंधांमुळे त्रास झाला. त्यामुळे एका डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये त्यानं मला नेऊन उपचार केले. त्यानंतर त्याने माझ्याकडे पाठ फिरवली. त्याचं वागणं बदललं. अर्वाच्य भाषेत मला सुनावलं. पाच वर्षं मला भोगल्यानंतर संबंध तोडून टाकले.
हा ‘लव्ह जिहाद’, त्याला धडा शिकवा!!
या युवकानं माझ्या भावनांशी खेळ केला. माझी फसवणूक केली. लव्ह जिहादचं षडयंत्र रचून माझा उपभोग घेतला. त्याला अटक करून कायदेशीर कारवाई करा, अशी तक्रार तिनं दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांकडे केली होती. या छळवणुकीमुळे आपण आत्महत्येचा प्रयत्नही केला होता, असं तिनं तक्रारीत म्हटलंय.