मनी लाँड्रिंग प्रकरण | 26 जुलैला दिगंबर कामत आणि चर्चिल आलेमाव हाजिर हो

काय आहे लुई बर्जर प्रकरण? वाचा सविस्तर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: ‘लुई बर्जर’प्रकरणी आमदार दिगंबर कामत आणि चर्चिल आलेमाव यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत आरोप निश्चित करण्याचा निवाडा म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे दिला आहे. या प्रकरणी दोघा संशयितांना येत्या २६ जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेत. अंमलजाबणी संचालनालयाने सदर तक्रार नोंदवून मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला होता.

हेही वाचाः कणकवलीत गडनदी, जानवली नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ

अमेरिकेच्या लुईस बर्जरला निविदा

गोव्यात 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी जपान सरकारने आर्थिक मदत देण्याचं ठरवलं होतं. जपानच्या जायका नामक महामंडळाला जबाबदारी दिली होती. या प्रस्तावाचा अभ्यास करून प्रकल्प अहवाल सादर करण्यास आंतरराष्ट्रीय निविदा जारी झाली तेव्हा अमेरिकेच्या लुईस बर्जर आस्थापनाला निविदा मिळाली.

हेही वाचाः मुंबई गोवा महामार्ग ठप्प; कणकवलीत वागदेजवळ हायवेवर पाणीच पाणी

मंत्री, अधिकाऱ्यांना 75 कोटींची लाच

या लुईस बर्जर अस्थापनाने प्रकल्प अहवाल सादर करण्याचं कंत्राट मिळवण्यासाठी सुमारे 75 कोटी गोव्यातील मंत्री आणि अधिकाऱ्यांना लाच दिली होती, हे अमेरिकेतील न्यायालयात उघड झालं आणि लुईस बर्जर कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोषी ठरवून शिक्षाही झाली. याची दखल घेऊन गुन्हे शाखेने माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि माजी साबांखा मंत्री चर्चिल आलेमाव यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची दखल घेऊन अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात माजी मुख्यमंत्री काम आणि माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांच्या विरोधात मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत 6 ऑगस्ट 2015 प्राथमिक चौकशी करून न्यायालयात 12 जुलै 2018 रोजी आरोपपत्र दाखल केलं होतं. या आरोपावर न्यायालयाने गुरुवारी दोघा संशयितांविरोधात आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिला आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | CM ANGRY | खाणी सुरू करण्यासाठी मीच प्रयत्न केले : मुख्यमंत्री

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!