या दिवशी लावता येणार लाऊड स्पिकर

यावर्षी एकूण १५ रात्री लाऊड स्पीकर लावण्याला मुभा; पर्यावरण खात्याकडून आदेश जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : यंदा २०२१ वर्षातील दिवाळी, नाताळ यांसह कोजागिरी व त्रिपुरारी पौर्णिमेला रात्री लाऊड स्पीकर लावण्याची मुभा सरकारने दिलीये. संबंधितांना जिल्हाधिकाऱ्यांकडून परवाना मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल. परवाना प्राप्त झाल्यानंतरच रात्री १२ पर्यंत लाऊड स्पीकर लावता येईल. राज्य पर्यावरण खात्याने याबाबतचा आदेश जारी केला आहे.

केवळ या दिवशी लाऊड स्पीकर लावण्याची परवानगी

यावर्षी एकूण १५ दिवस रात्री १० ते १२ पर्यंत लाऊड स्पीकर लावण्याला मुभा देण्यात आलीये. ते दिवस पुढील प्रमाणे : कार्निव्हलचा अखेरचा दिवस (१६ फेब्रुवारी), होळी (२८ मार्च), इस्टरची पूर्वसंध्या (३ एप्रिल), गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस (११ सप्टेंबर), गणेश चतुर्थीचा पाचवा दिवस (१४ सप्टेंबर), अनंत चतुर्दशी (१९ सप्टेंबर), नवरात्रीचा पहिला दिवस (१४ ऑक्टोबर), कोजागिरी पौर्णिमा (१९ ऑक्टोबर), दिवाळीची पूर्वसंध्या (३ नोव्हेंबर), दिवाळी (४ नोव्हेंबर), त्रिपुरारी पौर्णिमा (१८ नोव्हेंबर), नाताळची पूर्वसंध्या (२४ डिसेंबर), नाताळ (२५ डिसेंबर) आणि नूतन वर्षाची पूर्वरात्री (३१ डिसेंबर).

केस टु केस तत्वावर परवाना देणार

केस टु केस तत्वावर लाऊड स्पीकरचा परवाना मिळणारेय. लाऊड स्पीकरचा परवाना दिल्यानंतर संबंधीतत यंत्रणा आवाजाची तपासणी करतील. कायद्याने ठरवल्यानुसार लाऊड स्पीकरचा आवाज वाढवायला मिळणारेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!