शॉर्ट सर्किटमुळे वाळपईत घराला आग

Goan Varta Live | प्रतिनिधी
वाळपईः शनिवारी मध्यरात्री वाळपईतील हातवाडा येथील इजाज अहमद यांच्या घरातील फ्रीजला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामुळे लागलेल्या आगीत जवळपास दीड लाखांचं नुकसान झालं आहे. प्रसंगावधान राखून घरातील माणसं वेळीच बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
हेही वाचाः ACCIDENT | फोंडा – सावईवेरे मार्गावरील कदंबा बसचा अपघात
शनिवारी मध्यरात्रीची घटना
मिळालेल्या माहितीनुसार वाळपई नगरपालिका क्षेत्रातील हातवाडा या ठिकाणी इजाज अहमद यांचं घर आहे. त्यांनी शनिवारी आपल्या घरात नवीन फ्रीज आणला. रात्री अचानक फ्रीजच्या जवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. शॉर्ट सर्किट झाल्याचं समजताच घरातील सर्वजण घराबाहेर पडले. हा प्रकारामध्ये शनिवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडला.
हेही वाचाः ‘ठाकुर सज्जन सिंह’ फेम अभिनेते अनुपम श्याम काळाच्या पडद्याआड
जवळपास 1.50 लाखांचं नुकसान
या घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाचे जवाल घटनास्थळी हजर झाले. काही प्रमाणात घराचा भाग वाचवण्यात त्यांना यश आलं. या घटनेमुळे जवळपास 1.50 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. घरातील मागील बाजूचा भाग आगीच्या भक्षस्थानी पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात घराचं नुकसान झालं आहे.
हेही वाचाः फादर रॉजन गुदीन्हो यांचे सर्वांनाच खडे बोल