डिचोली तालुक्यात 140 शेतकऱ्यांचं नुकसान

33 लाखांची हानी; जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोलीः काही दिवसांपूर्वी तौक्ते चक्रीवादळाच्या रुपाने आलेल्या अस्मानी संकटात  डिचोली तालुक्यातील  140 शेतकऱ्यांचं  सुमारे 33 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. नुकसान भरपाईसाठी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आल्याची माहिती डिचोली विभागीय कृषी अधिकारी नीलिमा गावस यांनी दिली.

हेही वाचाः गोवा शिक्षण विभागाने मागवले कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे तपशील

जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर

तालुक्यातील अनेक भागातील केळी, काजू, आंबा, सुपारी आणि इतर पिकांचं नुकसान झालं. या नुकसानाचा संपूर्ण अहवाल  कृषी खात्याचे अधिकारी तसंच कर्मचारी वर्गाने तयार करून सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. अजून काही अर्ज  सादर करायचे आहेत, असं सांगण्यात आलंय. 

हेही वाचाः WORLD ENVIRONMENT DAY| निसर्ग रक्षण ही काळाची गरज

मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

दरम्यान मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी डिचोलीत काही दिवसांपूर्वी वादळात नुकसान झालेल्यांना मदत वितरित केली होती. त्यावेळी कृषी अधिकाऱ्यांना तातडीने झालेल्या नुकसानाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते आणि शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देण्याची  घोषणा केली होती.

हेही वाचाः CRIME | सांतिनेझ गोळीबार प्रकरणातील टोळीला अटक

तातडीची मदत पुरवावी

दरम्यान सभापती राजेश पाटणेकर यांनी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत पुरवावी अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे  केली असल्याचं सांगितलं होतं. 

हेही वाचाः VIRAL VIDEO | मोदीजी, आम्ही शिक्षणाची कुर्बानी द्यायला तयार आहोत

शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले असून कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री लवकरच मदत वितरित करतील अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. वादळात मोठ्या प्रमाणात केळी बागायत तसंच सुपारीचं मोठं नुकसान झालंय. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!