तीन महिन्यांत लोकायुक्तांची नियुक्ती करा

उच्च न्यायालयाचे गोवा सरकारला निर्देश : अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी दाखल केली होती याचिका.

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : गोव्याच्या लोकायुक्तांची नियुक्ती तीन महिन्यांत करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. जवळकर व न्या. महेश सोनक यांच्या द्विसदस्यीय खंडपिठाने गोवा सरकारला दिले आहेत. निवृत्त न्यायमूर्ती पी. के. मिश्रा 17 सप्टेंबर रोजी लोकायुक्त पदावरून पायउतार झाल्यानंतर हे पद रिक्त होते. अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी लोकायुक्तांची नियुक्ती लवकर करण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गोवा लोकायुक्त कायद्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा कोणत्याही उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीशच या पदासाठी पात्र ठरतात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.