गोवा मुक्तिदिनानिमित्त अनोखी लोगो स्पर्धा

विजयी लोगोला दहा हजार रुपयांचे रोख बक्षीस

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : स्पर्धा अनेक प्रकारच्या असतात स्पर्धेचं उत्कृष्ट आयोजन करण्यात आलं की आपोआपच त्या खेळाचा स्तर त्यातून लक्षात येतो. हे आयोजन म्हणजे केवळ वरवरचा दिखाऊपणा नव्हे, तर प्रत्यक्षात त्यात सहभागी झालेल्या स्पर्धकांचा दर्जा हा अधिक महत्त्वाचा असतो. 

यंदाचा साठाव्या गोवा मुक्ती दिनाचा एक भाग म्हणून सरकारने वर्षभर हा उत्सव साजरा करण्यासाठी अनोखी लोगो स्पर्धा घेण्याचे ठरविले आहे.

सरकारने गोव्यातील व्यक्तीला एक अनोखा लोगो डिझाईन करण्याचे आवाहन केले आहे आणि वैयक्तिक माहितीच्या नावाचा पत्ता मोबाईल नंबरसह ईमेल [email protected] gmail.com वर ईमेल पाठवावेत. स्पर्धा फक्त गोमंतकीय वंशाच्या लोकांसाठी खुली आहे. तसेच ही स्पर्धा एक वेगळी ओळख निर्माण करेल आणि सरकारच्या प्रत्येक पत्रव्यवहारासाठी त्या लोगोचा वापर करण्याचा सरकारचा उपक्रम आहे.

आपल्या प्रवेशाच्या नोंदणीसाठी अंतिम तारीख १४ डिसेंबर २० असून, त्या दिवशी संध्याकाळी ५.३० पर्यंत प्रवेश नोंद केले जाणार आहेत.

विजयी लोगोला दहा हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने कळविले आहे.स्पर्धकांनी या अनोख्या स्पर्धेत नक्की भाग घ्या…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!